1 / 8साडी, चुणीदार, लेहेंगा, अनारकली, ड्रेस कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी त्यावर सुंदर असे दागिने तर असायलाच हवेत. कानातले तर हवेतच त्याबरोबर गळ्यातही काहीतरी असायला हवे. 2 / 8अनेक प्रकारचे नेकलेस आजकाल मिळतात. कशावर काय सुट होते त्यानुसार विविध प्रकारचे पॅटर्नस मिळतात. पाहा सध्या काय ट्रेंडींग आहे. यंदा दिवाळीसाठी काय घ्यायचे त्यासाठी आयडिया नक्कीच सुचेल. 3 / 8सुंदर असे नाजूक फुलाचे डिझाइन असलेले गळ्यातले घ्या. साडी आणि ड्रेस दोन्हीवर मस्त दिसते. 4 / 8सिंगल पेंडेंट असलेले बारीक गळ्यालगत असा नेकलेस नक्की वापरुन पाहा. कॉटन साडीवर मस्त दिसेल. 5 / 8मोत्याचा साधा नाजूक हार साडीवर छान दिसतो. त्याला लहानसे पेंडेंट असेल तर ते आणखी छान दिसते. 6 / 8चमकदार जरा वेगळ्या स्टाइलिश साड्यांसाठी पांढरा खडा सुंदर दिसतो. दिसायला नाजूक आणि जरा भरलेले असे गळ्यातले ट्रेंडींग आहे. 7 / 8सिंपल असा डायमंड नेकलेस ड्रेस, साडी दोन्हीवर सुंदर दिसतो. तसेच हलका असतो. गळ्यालगत असलेलाच घ्या. छान दिसेल.8 / 8सोनेरी चोकर जरीच्या साडीवर मस्त दिसतो. भरलेले मोठे हार आवडत नसतील तर चोकर हा अगदी मस्त पर्याय आहे.