1 / 17उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणे ही प्रत्येक महिलेसाठी मोठी गरजेची गोष्ट असते. वाढत्या उकाड्यात हेव्ही आणि सिंथेटिक कपड्यांऐवजी हलके, सॉफ्ट आणि हवा खेळती राहील असे आउटफिट्सलाच (Cotton Anarkali with Palazzo for summer) अधिक पसंती दिली जाते. अशावेळी अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो हा आऊटफिट कम्फर्ट आणि एलिगन्सचे परफेक्ट उदाहरण आहे. फ्लोई अनारकली पॅटर्नमुळे ग्रेसफुल लूक मिळतो, तर कॉटन फॅब्रिक शरीराला थंडावा देत दिवसभर फ्रेश ठेवते(Summer wear Anarkali suits for women).2 / 17उन्हाळ्याचा तडाखा वाढला की, हेव्ही आणि सिल्कचे कपडे नकोसे वाटतात. अशावेळी आपल्याला गरज असते ती मऊ, सुती आणि अंगाला न टोचणाऱ्या कपड्यांची. पण उन्हाळ्यात आराम हवा म्हणून स्टाइलशी तडजोड कशाला? यासाठीच 'अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो' हा असा ट्रेंड आहे जो तुम्हाला उन्हाळ्यातही स्टायलिश लूक देतो आणि घामापासूनही सुटका करण्यास मदत करतो. 3 / 17अनारकलीचा घेर तुम्हाला कम्फर्टेबल लूक देतो, तर प्लाझोमुळे हालचाल (Budget-friendly cotton Anarkali sets) करणे सोपे होते. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व स्टायलिश सेट्स तुमच्या बजेटमध्ये (Budget-friendly) उपलब्ध आहेत.4 / 17उन्हाळा म्हटलं की हलके, सैल आणि त्वचेला आराम देणारे कपडे हीच पहिली पसंती ठरते. वाढत्या तापमानामुळे जड आणि टाईट आउटफिट्स घालणे अनेकदा त्रासदायक ठरते, त्यामुळे फॅशनसोबत कम्फर्ट देणाऱ्या कपड्यांची मागणी वाढते. अशावेळी अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझो हा आउटफिट महिलांसाठी परफेक्ट समर स्टाइल ठरतो.5 / 17ऑफिस, कॅज्युअल आऊटिंग, ट्रॅव्हल किंवा छोट्या समारंभांसाठीही सहज घालता येणारे हे आऊटफिट्स बजेटमध्ये उपलब्ध असल्याने महिलांमध्ये सध्या विशेष ट्रेंडमध्ये आहेत. यंदाच्या समर सीझनसाठी स्टायलिश आणि बजेट-फ्रेंडली अनारकली कॉटन कुर्ती विथ प्लाझोचे काही आकर्षक डिझाइन्स पाहूयात.6 / 17अनारकली कॉटन कुर्ती आणि प्लाझो हे असं कॉम्बिनेशन आहे, जे तुम्हाला उन्हाळ्यात 'एअर कंडिशन' सारखा थंडावा देतं आणि लुकमध्ये मात्र 'नवाबी थाट' टिकवून ठेवतं.7 / 17हलका गुलाबी किंवा पिस्ता रंग उन्हाळ्यासाठी डोळ्यांना थंडावा देतो. यावर मोठ्या फुलांचे प्रिंट्स अतिशय फ्रेश लूक देतात. यावर पांढऱ्या रंगाचा चिकनकारी प्लाझो खूप उठून दिसतो.8 / 17इंडिगो रंग कधीच आऊटऑफ फॅशन जात नाही. शुद्ध सुती कापड घाम शोषून घेण्यास मदत करते. यावर ऑक्साइड ज्वेलरी (Oxidized Jewellery) घातल्यास तुमचा लूक परिपूर्ण होईल.9 / 17जर तुम्हाला थोडा वेगळा लूक हवा असेल, तर अनारकलीसोबतच अंगरखा पॅटर्न देखील तितकाच छान दिसतो. याला असणाऱ्या दोऱ्या कुर्तीला एक वेगळाच हटके लूक देतात. यासोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा प्लाझो (Straight Palazzo) छान दिसतो.10 / 17राजस्थानी हँडब्लॉक प्रिंट्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हलके फॅब्रिक आणि पारंपरिक प्रिंट्समुळे एथनिक पण समर-फ्रेंडली लूक मिळतो. पारंपारिक राजस्थानी ब्लॉक प्रिंट्स असलेले अनारकली सेट्स बजेटमध्ये सहज उपलब्ध होतात आणि प्रीमियम लूक देतात. यावर कोल्हापुरी चप्पल घातल्यास तुमचा 'देसी स्वॅग' नक्कीच उठून दिसेल.11 / 17जास्त फ्लेअर नको असणाऱ्यांसाठी ए-लाइन कट अनारकली आणि स्ट्रेट प्लाझो हा स्मार्ट व कम्फर्टेबल पर्याय.12 / 17लखनवी चिकनकारी वर्क असलेली कॉटन कुर्ती उकाड्यातही रॉयल आणि क्लासी लूक देते. लाइट दुपट्ट्यासोबत हा लूक अधिक आकर्षक दिसतो.13 / 17लहान फ्लोरल प्रिंट्स आणि फ्लेअर्ड प्लाझोमुळे आउटफिटला सॉफ्ट आणि फेमिनिन लूक मिळतो. डे टाइम फंक्शनसाठी उत्तम पर्याय.14 / 17हलके पेस्टल शेड्स उन्हाळ्यासाठी बेस्ट ठरतात. फ्लोरल किंवा ब्लॉक प्रिंट असलेली कॉटन अनारकली कुर्ती प्लाझोसह खूपच फ्रेश आणि एलिगंट दिसते.15 / 17 हलकी गोटा पॅटी किंवा लेस वर्क असलेली कॉटन अनारकली साध्या लूकला फेस्टिव टच देते — छोट्या कार्यक्रमांसाठी योग्य.16 / 17अजरख प्रिंट्स एथनिक आणि क्लासी दिसतात. ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.17 / 17खूप उकाडा असेल तर स्लीव्हलेस किंवा थ्री-फोर्थ स्लीव्ह डिझाइन अधिक आरामदायी ठरते. डे आउटिंगसाठी परफेक्ट.