पाहा थंडी स्पेशल सुपरस्टायलिश गरम कपड्यांचे ८ ट्रेंडी प्रकार, खिसा आणि तुम्ही दोघांनाही ठेवतील गरम
Updated:November 17, 2025 15:30 IST2025-11-17T15:22:50+5:302025-11-17T15:30:17+5:30
Check out 8 trendy types of super stylish warm clothes for the winter season, they will keep both warm and stylish : थंडीत घाला खास पॅटर्न. विंटर वेअरसाठी मस्त फॅशनेबल कपडे.

१. केबल निट पॅटर्न (Cable Knit)
मोठ्या धाग्याने विणलेला हा पॅटर्न स्वेटर, कार्डिगन आणि स्कार्फसाठी खूप वापरला जातो. दिसायला क्लासिक, उबदार आणि भारी कपड्यांसारखा दिसतो.
२. रिब्ड निट पॅटर्न (Ribbed Knit)
हे पॅटर्न अंगाला फिट होणाऱ्या स्वेटर, टॉप आणि टर्टलनेकमध्ये दिसतात. हिवाळ्यात स्टायलिश तसेच आरामदायक पर्याय.
३. हेरिंगबोन पॅटर्न (Herringbone)
कोट, ओव्हरकोट आणि जॅकेटमध्ये हा पॅटर्न दिसतो. थोडा शार्प, फॉर्मल आणि एलिगंट लूक देणारे डिझाईन आहे.
४. प्लेड / चेक्स पॅटर्न (Plaid/Checks)
शाल, जॅकेट, कोट आणि वूलन स्कर्टमध्ये सर्वात लोकप्रिय हा पॅटर्न असतो. विंटर फॅशनचे हे नेहमीचे आणि ट्रेंडी पॅटर्न आहेत.
५. हाउंडटूथ पॅटर्न (Houndstooth)
क्लासिक आणि स्टायलिश असा हा डिझाइन कोट, ब्लेझर आणि वूलन पँट्समध्ये आवडीने वापरला जातो.
६. फेअर आयल पॅटर्न (Fair Isle)
अनेक रंगांचे पारंपारिक निटिंग डिझाईन. ख्रिसमस स्वेटर, फुल-स्लीव्ह स्वेटर आणि कार्डिगनमध्ये खूप लोकप्रिय प्रकार असून दिसतातही सुंदर.
७. डायमंड आर्गाइल पॅटर्न (Argyle)
डायमंड आकाराचे जाळीसारखे डिझाईन पुलओव्हर, स्वेटर-वेस्ट आणि मोज्यांमध्ये मिळणारा हा पॅटर्न आहे.
८. वूलन एम्ब्रॉयडरी पॅटर्न
शाल, स्वेटर आणि कुर्ती-कोटांवर सूक्ष्म धाग्यांची भरतकाम केलेली स्टायलिश डिझाइन असते. पारंपारिक आणि मॉडर्न दोन्हीमध्ये दिसते.