1 / 6१. २०१८ साली अभिनेता शाहरुख खान याच्या लहान मुलाच्या म्हणजेच अबरामच्या बुटांचा फोटो व्हायरल झाला होता. त्या चिमुरड्या बुटांची किंमत तब्बल ५५ हजार रुपये एवढी होती. त्याचे ते बुटं Balenciaga या फॅशन हाऊसचे होते.2 / 6२. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची मुलगी मालती ही अवघी एक ते दिड वर्षाची आहे. ती जेव्हा पहिल्यांदा ओपनली कॅमेऱ्यासमोर आली होती तेव्हा तिच्या पायात luxurious label, Christian Louboutin या ब्रॅण्डचे मेटालिक बूट होते. त्या बुटांची किंमत ३५ हजारांपेक्षाही जास्त आहे.3 / 6३. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिने तिच्या सहाव्या वाढदिवसाला जो ड्रेस घातला होता तो सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केला होता. या ड्रेसची किंमत ६० हजार रुपये एवढी होती. 4 / 6४. आराध्या बच्चन हिची एक महागडी वस्तू मध्यंतरी खूप चर्चेत होती. ती म्हणजे तिची बॅग. आराध्याच्या पाठीवर असणाऱ्या या पिवळ्या Gucci बॅगची किंमत तब्बल ९१ हजार रुपये आहे. 5 / 6५. २०२२ साली झालेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात अभिनेता फरदीन खान त्याच्या मुलीसोबत आला होता. यावेळी त्याच्या मुलीने घातलेला ड्रेस Versace या ब्रॅण्डचा होता आणि त्याची किंमत ९० हजार रुपये होती. 6 / 6६. काही महिन्यांपुर्वी करिना कपूर तिच्या कुटूंबासोबत ट्रिपला गेली होती. यावेळी तिचा मोठा मुलगा तैमूर याने घातलेलं Ralph Lauren या ब्रॅण्डचं पुलओव्हर १३ हजारांचं होतं.