1 / 8कित्येक अभिनेत्रींना आपण मोठ्या पडद्यावर नवरीच्या भुमिकेत पाहिलेलं असतं. पण स्वत:च्या लग्नासाठी त्या कशा तयार झाल्या होत्या हा त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच एक उत्सूकतेचा विषय असतो. 2 / 8म्हणूनच रिअल लाईफमध्ये नवरी म्हणून पाहा कशा सजल्या होत्या या काही अभिनेत्री.. त्यापैकी कतरिना कैफची ही सुंदर झलक. तिने लाल रंगाचा टिपिकल घागरा घालण्यास पसंती दिली होती.3 / 8नुकतीच आई झालेली परिणिती चोप्रा तिच्या लग्नाच्या वेळी अशा मोतिया रंगाच्या सुंदर घागऱ्यात दिसून आली.4 / 8नवरीने लग्नात भडक रंगाचे कपडे घातले पाहिजेत हा ट्रेण्ड जणू काही आलिया भटने मोडीत काढला आणि सायलेंट रंगाच्या ब्रायडल कपड्यांचा नवा ट्रेण्ड आणला. 5 / 8आलिया भटनंतर कियारा आडवाणीही तिच्या लग्नात अशा फिकट गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसून आली. 6 / 8सोनाक्षी सिन्हाने तिच्या स्वत:च्या लग्नात घालायला अशी गडद लाल रंगाची बनारसी साडी निवडली होती. साडीला शोभून दिसणारी पारंपरिक वेशभुषा, मोठी टिकली आणि मोजके दागिने अशा थाटात सोनाक्षी नवरी म्हणून दिसून आली.7 / 8जेनेलियाने मुंडावळ्या बांधून तिच्या लग्नात असा सुंदर मराठी लूक केला होता.8 / 8तर मराठमोळी माधुरी दीक्षित नवरी म्हणून अतिशय देखणी, सालस दिसत होती.