Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लाडक्या लहान लेकीसाठी चांदीचा खास दागिना, छुमछूम वाजणारे ५ सुंदर पैंजण- लहान मुलींसाठी खास..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2025 21:25 IST

1 / 7
आजकाल पालकांना आपल्या लेकीसाठी काहीतरी खास, वेगळं, आणि टिकाऊ द्यायचं असतं. खेळणी तर येतात-जातात, कपडे लहान होतात, पण चांदीचे दागिने. ते आठवण म्हणून कायम जपता येतात. (Silver anklets for baby girl)
2 / 7
सध्या बाजारात चांदीच्या पैंजणांची मागणी पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. बाजारात असंख्य डिझाइन्स, पॅटर्न्स आणि स्टाइल्स उपलब्ध आहेत. जर आपणही लाडक्या लेकीसाठी पैंजण शोधत असाल तर पाहा खास डिझाइन्स. (Kids silver payal designs)
3 / 7
ब्लॅक पर्ल पायल आपण आपल्या लेकीसाठी खरेदी करु शकतो. असं म्हटलं जातं यात असणारे काळे मणी बाळाचे वाईट नजरेपासून संरक्षण करते.
4 / 7
लहान मुलींसाठी बाजारात पैंजण कडा खूप प्रसिद्ध आहे. जर आपणही आपल्या मुलीसाठी काहीतरी वेगळे शोधत असाल तर ही डिझाइन नक्की घ्या.
5 / 7
बऱ्याच लहान मुलांना घुंगरु असणारे पायातले जास्त आवडतात. ते पायात घालून सतत वाजवत असतात. यामध्ये आपल्याला विविध आणि नवीन डिझाइन्स पाहायला मिळतील.
6 / 7
मिनिमल बेल चार्म पैंजण हे फार जड नसतात आणि पायात देखील सहज बसतात. रोजच्या वापरासाठी हा चांदीचा दागिना बेस्ट आहे.
7 / 7
मुलीसाठीही आजकाल टेम्पल डिझाइन पैंजणाचा ट्रेंड वाढलाय. नाणी, फुलं, कमळ, किंवा देवीच्या छोट्या प्रतिकांसारखे डिझाइन असतात. पूजा, समारंभ, फोटोशूट किंवा सणांसाठी हा एकदम शोभून दिसतो.
टॅग्स : फॅशनलहान मुलं