Join us
Daily Top 2 Weekly Top 5

साडी नेसून सुंदर- सोज्वळ दिसायचंय? साई पल्लवीकडून घ्या टिप्स, बघा तिचे ५ डिसेंट साडी लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2024 15:59 IST

1 / 7
साई पल्लवी ही एक अशी अभिनेत्री आहे जी ग्लॅमरस कपड्यांपेक्षा साध्या कपड्यांमध्येच जास्त उठून दिसते आणि तिच तिची खरी ओळख आहे. तिच्या कपड्यांच्या निवडीमध्ये साधेपणा, सोज्वळपणा आहे. आणि तोच तर तिच्या चाहत्यांना सगळ्यात जास्त भावून जातो.
2 / 7
तुम्हालाही लग्नसराईनिमित्त किंवा एरवीही कधी साडी नेसायची असेल आणि साडी नेसल्यानंतर छान सोज्वळ लूक हवा असेल तर कशा पद्धतीने साडी नेसावी, ब्लाऊज कसं असावं अशा काही टिप्ससाठी साई पल्लवीचे हे काही लूक बघाच..
3 / 7
बंद गळ्याचं ब्लाऊज आणि त्याला समोरच्या बाजुने छोटासा व्ही कट.. हा पॅटर्नसुद्धा खूप छान दिसतो.
4 / 7
हिवाळ्यात असे बंद गळ्याचे ब्लाऊज खूप ट्रेडिंग आहेत. असं एखादं ब्लाऊज शिवायला हरकत नाही.
5 / 7
लांब बाह्यांचे ब्लाऊज हिवाळ्यातल्या लग्नसराईमध्ये खूप जास्त चालतात. असं एखादं ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असावंच...
6 / 7
प्लेन साडी आणि त्यावर प्रिंटेड ब्लाऊज हा लूक पण खूप छान दिसतो. असं साडी- ब्लाऊज कॉम्बिनेशन आणि त्यावर ऑक्सिडाईज दागिने हा ट्रेण्ड सध्या खूप इन आहे.
7 / 7
स्लिव्हलेस ब्लाऊजमध्येही किती डिसेंट लूक मिळवता येतो ते पाहा..
टॅग्स : फॅशनसाई पल्लवीसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स