By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 17:31 IST
1 / 10ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी सध्या डीप बॅक आणि नॉड्स असलेले डिझाईन्स खूपच लोकप्रिय झाले आहेत. जर तुम्हाला गळा मोठा आणि आकर्षक दिसायला हवा असेल तर या डिझाईन्स नक्की ट्राय करा. (10 Latest Back Neck Blouse Designs)2 / 10ही सर्वात क्लासिक डिझाईन आहे. गळा खोल ठेवल्यामुळे पाठ मोठी आणि सुंदर दिसते. याच्या वरच्या बाजूला नाजूक दोरी आणि त्याला जड लटकन लावल्यामुळे तो अधिक युनिक वाटतो. (10 Trendy back neck blouse patterns)3 / 10यात पाठीच्या मध्यभागी मोठा हिऱ्याच्या आकाराचा किंवा पाण्याच्या थेंबासारखा कट दिला जातो. या कटच्या टोकाला किंवा वरच्या बाजूला डबल नॉड्स लावल्यानं ब्लाऊजला डिझायनर लूक मिळतो.4 / 10पाठीवर तीन ते चार आडव्या दोऱ्या लावून त्यांना मध्यभागी गाठ मारल्यास मोठा आणि स्टायलिश लूक दिसेल. हे डिझाईन्स मॉडर्न साड्यांवर खूपच छान दिसते.5 / 10 ज्यांना खांदे रूंद दिसायला हवे आहेत. त्यांनी खोल चौरस गळा निवडावा. याच्या कोपऱ्यांवर गोंडे असलेले नॉड्स लावल्यानं पारंपारीक साडीलाही ट्रेंडी लूक येतो.6 / 10पाठीवर खोल व्ही कट देऊन खालच्या बाजूला मोठी फॅन्सी गाठ किंवा लांब दोऱ्या सोडल्यास उंची जास्त असल्याचं दिसून येतं.7 / 10या सर्व डिझाईन्स नॉड्सचा वापर केल्यामुळे ब्लाऊज खाद्यांवरून उतरत नाही आणि फिटींगसुद्धा नेटकी बसते.8 / 10मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजला साधे गोंडे न लावता तुम्ही या प्रकारचे स्टायलिश गोंडे लावू शकत. ज्यामुळे तुमचा लूक अधिक खुललेला दिसेल.9 / 10कॉटनच्या साडीवर ब्लाऊज शिवणार असाल तुम्ही या प्रकारचे ब्लाऊज ट्राय करू शकता. ज्यामुळे बॅकचा शेप अधिकच उठून दिसेल.10 / 10फुल स्लिव्हजं ब्लाऊज आणि या प्रकारचा मागच्या बाजूनं सिंपल ठेवलेला पॅटर्न तुमचं सौंदर्य अधिकच खुलवेल.