प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

Updated:May 29, 2025 17:56 IST2025-05-29T17:47:48+5:302025-05-29T17:56:35+5:30

Preity Zinta: Not only beautiful but also brave! She gave up a torturous relationship, was not afraid of the mafia's threats : प्रीती झिंटाने आयुष्यात फक्त अभिनयच नाही केला. इतरही अनेक कार्यांमध्ये सहभाग घेतला. पाहा तिची लाइफस्टोरी.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिची जीवन कहाणी फार कोणाला माहिती नाही. प्रिती तिच्या अभिनय कौशल्यासोबतच, तिच्या धाडस, बुद्धिमत्ता आणि विविध क्षेत्रांतील योगदानासाठी ओळखली जाते.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

प्रितीने हल्लीच शहीद भारतीय सैनिकांच्या पत्नी व मुलासांठी आर्थिक मदत म्हणून १.१० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यासाठी प्रीतीचे भारतभरातून कौतुकही केले गेले. प्रीती स्वत: एका लष्करी कुटुंबाचा भाग आहे.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

प्रीतीचे वडील दुर्गानंद झिंटा हे भारतीय लष्करातील एक अधिकारी होते. प्रीती १३ वर्षाची असताना एका कार अपघातात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि प्रीतीच्या आईला फार गंभीर दुखापत झाली. तिच्या आईला पुढे बरे व्हायला दोन वर्षे लागली. या प्रसंगामुळे प्रीतीच्या आयुष्यात मोठा बदल घडला.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

प्रीतीने मात्र फार धीराने सगळे सहन केले. वयाच्या १३व्या वर्षीच अशा परिस्थितीला सामोरे गेल्यामुळे वयाच्याआधीच तिला मोठे व्हावे लागले. परिस्थितीमुळे तिला परिपक्व व्हावे लागले. तेव्हा प्रीती शिमल्यात राहायची. तिकडेच तिने शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

प्रीतीने नंतर गुन्हेगारी मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. प्रीतीने सुरवात मॉडलिंगने केली होती. एका पार्टीमध्ये असताना प्रीतीला पर्क चॉकलेटच्या जाहिरातीसाठी काम करण्याची संधी चालून आली प्रीतीने लगेच होकार दिला. त्या एका जाहिरातीमुळे प्रीतीच्या करियरला चालना मिळाली.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

पुढे प्रीतीला मणिरत्नम यांनी दिल से या चित्रपटासाठी ऑफर दिली. त्यानंतर प्रीतीचे नाव बॉलिवूडमध्ये गाजायला लागले. तिला अनेक चित्रपट मिळायला लागते.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

२००३ ते २००४ च्या काळात प्रीतीने फार धाडसी पाऊल उचलत भरत शाह प्रकरणात ग्वाही दिली होती. तिला अनेक धमक्यांना सामोरे जावे लागले होते मात्र तरी तिने छोटा शकील सारख्या गुंडाविरुद्ध ग्वाही दिली होती. त्यासाठी तिला रेड अँण्ड व्हाइट ब्रेव्हरी पुरस्कार मिळाला होता.

प्रीती झिंटा : सुंदरच नाही तर धाडसीही! छळणारं नातं झुगारलं, माफियाच्या धमकीलाही घाबरली नाही..

यंदाची आयपीएल स्पर्धा प्रीतीचा पंजाब संघ गाजवतो आहे. मात्र डिसेंसी, खेळाचा आणि खेळाडूंचा आदर आणि सम्यक, समतोल वर्तन हे तिचे वागणे अर्थातच चर्चेचा आणि आदराचा विषय ठरले आहेत.