Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Happy Birthday Deepika Padukone: बॉलिवूडच्या मस्तानीची चाळिशी, पाहा दीपिका पादुकोणविषयी ५ अननोन भन्नाट गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2026 15:18 IST

1 / 7
बॉलीवूड क्वीन, मस्तानी म्हणून ओळखली जाणारी दीपिका पादुकोण ४० वर्षांची झाली आहे. सौंदर्य, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व यांचा सुंदर संगम असलेली दीपिका आज जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करते.
2 / 7
चाळीशी गाठली तरी दीपिकाचा आत्मविश्वास, फिटनेस आणि कामावरील प्रेम आजही तरुणांना प्रेरणा देणारं आहे. दीपिकाच्या आयुष्यातील अशाच काही कमी माहित असलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
3 / 7
दीपिका पादुकोनने हिंदी चित्रपटातून नाही तर कन्नडमधून कामाला सुरुवात केली. २००६ मध्ये कन्नड चित्रपट ऐश्वर्या मधून केली होती. या चित्रपटातून तिला पहिली ओळख मिळाली.
4 / 7
दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे भारतातील दिग्गज बॅडमिंटनपटू आहेत. त्यामुळे दीपिकाही राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळत होती. मात्र पुढे तिने अभिनय करण्याचे ठरवले.
5 / 7
बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी दीपिका पादुकोण भारतातील टॉप मॉडेल्सपैकी एक होती. अनेक प्रसिद्ध ब्रँड्स, फॅशन शो आणि कॅलेंडर शूटमधून तिने स्वत:चे नाव कमावलं होतं.
6 / 7
मध्यंतरीच्या काळात तिला नैराश्याचा सामना करावा लागला. मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी तिने Live Love Laugh Foundation ची सुरुवात केली.
7 / 7
दीपिकाने XXX: Return of Xander Cage या हॉलीवूड चित्रपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडली. आज ती ग्लोबल ब्रँड्सची पहिली पसंती आहे.
टॅग्स : सेलिब्रिटीदीपिका पादुकोण