विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!
Updated:March 26, 2025 13:03 IST2025-03-26T12:56:50+5:302025-03-26T13:03:36+5:30
Check out this list of Marathi dishes that Vicky Kaushal likes, he loves misal and vada pav! : मुंबईमध्ये राहिलेल्या विकी कौशलला आवडतात अस्सल मराठी पदार्थ. चाटही आवडीने खातो.

विकी कौशल सध्या त्याच्या चित्रपटातील भूमिकांसाठी फार चर्चेत आहे. विकी विविध मुलाखतींमध्ये तो खाण्याचा शौकीन असल्याचे सांगताना दिसतो.
न्यू होली बाईट्स या चॅनलशी गप्पा मारताना विकीने त्याला आवडणार्या खाद्य पदार्थांची नावे सांगितली. विकीला महाराष्ट्रीय पदार्थ आणि पंजाबी पदार्थ दोन्ही फार आवडतात.
त्याला उकडीचे मोदक खायला आवडतात. विकीचा जन्म महाराष्ट्रातलाच आहे. त्याचे बालपण असेच पदार्थ खात गेल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे.
महाराष्ट्रातील लोकांना मिसळ पाव आवडत नाही असे अगदीच क्वचित असेल. मुंबईमध्ये राहिलेल्या विकीलाही मिसळ फार आवडते.
विकीला छोले मुळातच फार आवडतात त्यामुळे छोल्यांबरोबर समोस्याचे कॉम्बीनेशन केल्यावर खाण्यात नक्कीच स्वाद येतो. विकीला समोसा पावपेक्षा छोले समोसा आवडतो.
मुंबईमध्ये वडापाव हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विकी डाएट फुडही खातो मात्र त्याला वडापाव फार आवडतो.
पावामध्ये वडा जसा छान लागतो तसच भजीही छान लागते. विकीला भजी पावही फार आवडतो.
पंजाबी पदार्थांमध्ये बटाटा भरपूर वापरला जातो. विकीला आलू टिक्की हा पदार्थ आवडतो. आलू टिक्की हा एक चाटचा पदार्थ असून तो दिल्लीसारख्या ठिकाणी फार खाल्ला जातो.
चाटचे अनेक पदार्थ आहेत त्यापैकीच एक म्हणजे पापडी चाट. हा चटपटीत आणि आंबटगोड असा पदार्थ विकीचा फेवरेट आहे.
अनेक मुलाखतींमध्ये विकीने सांगितले आहे की त्याला छोले भटूरे प्रचंड आवडतात. त्याचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ हा छोलेच आहे.