Arjun- Saaniya Wedding : तेंडुलकरांच्या नव्या सुनबाईंचीच चर्चा, रुपानं साजिरी मोठ्या घरची लेक-करते व्यवसायही आगळावेगळा
Updated:March 5, 2026 18:01 IST2026-03-05T17:54:31+5:302026-03-05T18:01:09+5:30
Arjun–Saaniya Wedding: Sachin Tendulkar’s New Daughter-in-Law in Spotlight, Elegant Businesswoman from a Prominent Family : तेंडुलकरांची नवी सून आली घरी, कोण आहे सानिया चंडोक?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सासरेबुवा झाले. तेंडुलकरांच्या घरी नव्या सुनेचे स्वागत अगदी धूमधडाक्यात करण्यात आले. अर्जुन आणि सानियाचा विवाहसोहळा आनंदात पार पडला, भारतीय क्रिकेटपट्टू अर्जुन तेंडुलकर याचे लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी सानिया चंडोकबद्दल अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. ती नेमकी कोण आहे, काय करते आणि तिची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
सानिया चंडोक ही मुंबईतील व्यावसायिक कुटुंबाचा भाग आहे. नामवंत उद्योजक रवी घई यांची ती नात. तिचे कुटुंब अनेक वर्षांपासून व्यवसाय क्षेत्राशी जोडलेले असल्यामुळे ती लहानपणापासूनच व्यावसायिक वातावरणात वाढली. उच्च शिक्षणासाठी तिने लंडनमध्ये जाऊन बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास केला. वेटरनरी क्षेत्रातही तिने पदवी मिळवली.
सानिया ही स्वतःही उद्योजिका आहे. मुंबईमध्ये तिने पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी एक व्यवसाय सुरू केला आहे. पाळीव प्राण्यांसाठी ग्रूमिंग, केअर आणि वेलनेस सेवा देणारे हे केंद्र आहे. प्राण्यांबद्दलची तिची ओढ आणि त्यांची काळजी घेण्याची भावना यामुळेच तिने या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. या जागेचे नाव mr.paws असे आहे.
लहानपणापासूनच तिला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या आरोग्य आणि काळजीबाबत तिने प्रशिक्षणही घेतले आहे. यामुळे तिच्या व्यवसायाला अधिक व्यावसायिक स्वरूप मिळाले. तिला प्रतिसाद फार चांगला मिळतो.
जरी ती प्रसिद्ध कुटुंबातून असली तरी सानिया फारशी लाईमलाईटमध्ये राहणारी व्यक्ती नाही. ती सोशल मीडियावरही कमी सक्रिय असते आणि साधे, शांत आयुष्य जगणे पसंत करते.
सानिया आणि अर्जुन एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. कुटुंबांमध्ये मैत्री होतीच आणि हळूहळू या दोघांची मैत्री नात्यात बदलली, त्यानंतर दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाला सेलिब्रेटी , क्रिकेटर्स आणि इतरही अनेक जण उपस्थित होते.