1 / 6सध्या प्रत्येकाच्याच केसांच्या समस्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. कोणाचे केस खूप गळत आहेत, तर कोणाचे केस कमी वयातच पांढरे झाले आहेत. कोणाच्या केसातला कोंडा अजिबातच कमी होत नाही, तर कोणी केसांना वाढच नाही म्हणून वैतागलेले आहे.2 / 6केसांच्या बाबतीतल्या बहुतांश समस्या कमी करण्यासाठी आपला आहार चांगला असणं अतिशय गरजेचं आहे. पण त्यासोबतच केसांसाठी आपण काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.3 / 6आपल्याला केसांच्या बाबतीत कमी वयातच जो त्रास होत आहे, तो आपल्या मुलांना होऊ नये असं प्रत्येक पालकाला वाटतंच. म्हणूनच मुलांच्या केसांची काळजी घेण्यासाठी काय करावं, याविषयीचा उपाय प्रसिद्ध ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सुचवला आहे.4 / 6ते म्हणतात की लहान मुलांच्या केसांना कोणतंही तेल लावू नका. त्याऐवजी शुद्ध तूप लावून मुलांच्या डोक्याला अगदी हळूवारपणे मालिश करा. 5 / 6सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटीही शुद्ध तूप लावून डोक्याला मसाज करतात. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा आणि तुपाने मालिश केल्यानंतर साधारण एका तासाने केस धुवून टाकावे. 6 / 6त्याचबरोबर मुलांच्या आहाराकडेही लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला आहे. हा उपाय केल्याने मुलांच्या केसांची चांगली वाढ होईल, तसेच त्यांचे केस निरोगी होण्यास मदत मिळेल असं ते इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगतात.