1 / 7हाता-पायाचे वॅक्सिंग करण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. परंतु, काही वेळा वॅक्सिंग केल्यानंतर त्वचेचे नुकसान होते. (Avoid rashes after waxing)2 / 7उन्हाळ्यात वॅक्सिंग करताना आपल्याला प्रचंड त्रास होतो. हाता-पायाची आग होते. ज्यामुळे पायावर पुरळ येतात. जर उन्हाळ्यात आपण देखील वॅक्सिंग करणार असाल तर या टिप्स लक्षात ठेवा. (Safe summer waxing)3 / 7उन्हाळ्यात वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला एक्सफोलिएट करा. ज्यामुळे मृत त्वचा निघून जाण्यास मदत होईल. तसेच हाता-पायावरील फॉलिकल्स साफ होतील. 4 / 7अनेकांची त्वचा कोरडी असते अशावेळी वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ करु नका. वॅक्स करण्यापूर्वी आपण त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा इतर क्रीम लावली तर वॅक्स बरोबर सेट होत नाही. ज्यामुळे हाता-पायावरचे केस निघत नाहीत. (Waxing without irritation)5 / 7वॅक्स केल्यानंतर उन्हामध्ये जाऊ नका. घराबाहेर पडण्यापूर्वी आपले संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्या. अन्यथा त्वचा टॅन होईल. 6 / 7वॅक्सिंग केल्यानंतर जास्त टाईट कपडे घालू नका. यानंतर वॅक्स केल्यानंतर त्वचा जास्त संवेदनशील होते. ज्यामुळे रॅशेस आणि जळजळ होण्याची शक्यता अधिक असते. 7 / 7वॅक्स केल्यानंतर आपण हेवी वर्कआउट करत असू तर हाता-पायांना जळजळ होऊ शकते. त्यासाठी त्वचेवर रॅशेस-जळजळ होत असेल तर त्यावर बर्फ चोळा.