Vat Purnima Mehndi Designs: वटपौर्णिमेसाठी खास मेहेंदी डिझाइन्स, हातावर खुलणारा रंग आणि नात्यातला वाढता गोडवा...
Updated:June 9, 2025 15:01 IST2025-06-05T15:05:11+5:302025-06-09T15:01:09+5:30
Simple, Easy And Beautiful Vat Purnima Mehndi Design: मेहेंदी लावा सुंदर, पूजेसाठी हाताचीही वाढेल शोभा

Easy Mehndi Design for Vat Purnima
वटपौर्णिमेच्या सणाला (Vatpournima 2025) आता फक्त काही दिवसच बाकी राहिले आहेत. या खास सणाला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्याचजणी ( Vat Purnima Special Mehndi Design) अगदी नटुन - थटून तयारी करून येतात. सुंदर साडी, आकर्षक दागिने आणि पूजाअर्चा करण्यासाठीची थाळी अशी संपूर्ण साग्र - संगीत जय्यत तयारी झालेली असते.
वटपौर्णिमेनिमित्त अनेकजणी आपला लूक इतरांपेक्षा वेगळा कसा करता येईल, याच्या विचारात असतात. यासाठीच, साडी आणि दागिन्यांसोबतच हातांवर जर आपण सुंदर आणि रेखीव अशी मेहेंदी काढली तर आपला लूक चारचौघीत हमखास उठून दिसतोच.
हातांवरची सुरेख, प्रेमाचा रंग चढलेली मेहेंदी प्रत्येक स्त्रीच्या साजशृंगारात (Easy Beautiful Vat Purnima Mehndi Design) अधिक भर पाडते. यासाठी वटपौर्णिमेनिमित्त मेहेंदी काढायचा विचार असेल तर या सुंदर डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहाच.
Simple Mehndi Design for Vat Purnima
वटपौर्णिमेनिमित्त आपण 'सदा सौभाग्यवती भव' असे सुंदर अक्षरांत लिहिलेली मेहेंदी हातांवर काढू शकतो.
इतकेच नाही तर वटपौर्णिमेचे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देणाऱ्या सुंदर ओळी किंवा श्लोक आपण आपल्या मेहेंदीत लिहून मेहेंदीची शोभा वाढवू शकतो.
आपण आपल्या हातांवर वडाचे झाड व त्याभोवती फेरे घेणारी स्त्री अशी सुंदर मेहेंदी देखील काढू शकतो. वटपौर्णिमेच्यासणानिमित्त ही मेहेंदी डिझाईन तुमच्या लूकमध्ये अधिक भर पाडेल.
जर तुम्हांला कामांतून फारसा वेळ मिळाला नाही तर आपण हातांवर चटकन काढता येईल अशी अरेबिक मेहेंदीची डिझाईन्स काढू शकतो. अरेबिक मेहेंदीची नाजूक व जाळीदार नक्षी हातांवर खूपच उठून दिसेल.
साडीतील मराठमोळ्या लूकसाठी खास भरगच्च मेहंदी डिझाईन काढू शकता.
याचबरोबर सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या मेहेंदी डिझाईन्सपैकी आपण अशा प्रकारची साधीसोपी गोलाकार आकारातील वेगवेगळ्या डिझाइन्सची मेहेंदी देखील काढू शकता.
वडाचे झाड आणि पूजेचे थाळी हातात घेतलेल्या स्त्री अशी खास वटपौर्णिमेच्या सणाला साजेशी असणारी महानदी डिझाईन देखील खूपच आकर्षक दिसेल.
सध्या एकदम नाजूक आणि जाळीदार नक्षी असणारी मेहेंदी ट्रेंडमध्ये असल्याने आपण अशा प्रकारच्या मेहेंदी डिझाईन्स देखील नक्की ट्राय करुन पाहू शकता.