vat purnima 2025 : आजच करा ६ सोपे उपाय, वटपौर्णिमेच्या दिवशी चमकेल चेहरा- सगळ्यांपेक्षा दिसाल सुंदर
Updated:June 6, 2025 17:55 IST2025-06-01T18:00:00+5:302025-06-06T17:55:01+5:30
Vat Purnima 2025 skin care tips: Glowing skin tips for Vat Purnima: पल्या स्वयंपाकघरातील गोष्टींनी आपण चेहऱ्याची चमक पुन्हा आणू शकतो.

वटपौर्णिमा हा सण महिलांना नटण्या- मुरडण्यासाठी असतो. या दिवशी आपण अधिक सुंदर दिसावं यासाठी प्रयत्न करतो. धुळ, प्रदूषण आणि ताणतणावामुळे आपल्या चेहरा काळा पडतो. (Vat Purnima 2025 skin care tips)
या दिवशी चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आपल्याला महागड्या उत्पादनांची आवश्यकता नाही. आपल्या स्वयंपाकघरातील गोष्टींनी आपण चेहऱ्याची चमक पुन्हा आणू शकतो. (Glowing skin tips for Vat Purnima)
लिंबू आणि मधाचा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढण्यासाठी मदत करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ होईल. तसेच बेसन आणि दह्याचा पॅक त्वचेचा रंग सुधारतो.
मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिसळून एकत्र लावल्याने त्वचा थंड आणि चमकदार होते.
धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा काळी पडते. त्यासाठी किमान एकदा तरी चेहऱ्याची खोलवर स्वच्छता करा.
वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाब पाण्याने चेहरा स्वच्छ करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी कोरफडीच्या जेलने हलका मसाज करा. मेकअप करण्यापूर्वी हायड्रेटिंग मास्क लावा. यामुळे त्वचा चमकदार होते.
धूळ, घाम आणि प्रदूषणामुळे आपली त्वचा काळी पडते. त्यासाठी किमान एकदा तरी चेहऱ्याची खोलवर स्वच्छता करा.