1 / 7उन्हामध्ये खूप फिरणं झालं की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचा काळवंडून जाते.(use of tomato for removing tanning)2 / 7विशेषत: कपाळ, हात, मान, गळा हे भाग तर खूपच काळे पडलेले दिसतात. अशा पद्धतीने अंगावर झालेलं टॅनिंग काढून टाकायचं असेल तर पुढे सांगितलेला एक घरगुती उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.3 / 7हा उपाय करण्यासाठी लाल टोमॅटो किसून घ्या. त्याचा १ चमचा पल्प एका वाटीमध्ये घ्या. टोमॅटोमध्ये असणारे काही घटक त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतात.(how to use tomato pulp for tanned skin?)4 / 7आता टोमॅटो पल्पमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठ डेडस्किन काढून त्वचेवर चमक आणण्यास मदत करतं.(home hacks to remove tanning and dead skin)5 / 7यानंतर त्यामध्ये १ चमचा दही घाला. दह्यामध्ये असणारे घटक त्वचेला छान मऊ, मुलायम करून त्वचेवर चकाकी आणतात.6 / 7आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून एकत्र करा आणि त्याचा लेप त्वचेवर लावा. साधारण १० मिनिटांनी लेप अर्धवट सुकत आला की हाताने चोळून काढून टाका.7 / 7यानंतर चेहरा धुवून घ्या. तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान फरक जाणवेल. टॅनिंंग, डेडस्किन कमी होऊन त्वचेवर चमक आलेली दिसेल.