1 / 8चेहऱ्यावरची त्वचा कुठे काळपट तर कुठे उजळ अशी दिसत असेल म्हणजेच even skin tone नसेल तर हा एक उपाय तुमच्या नक्कीच उपयोगी येऊ शकतो. यामुळे त्वचेवर कुठेही पॅचेस दिसणार नाहीत आणि त्वचेचा पोत एकसारखा होईल...(home remedies for pigmented skin)2 / 8शिवाय हा उपाय केल्यामुळे पिगमेंटेशन आणि वांगाचे डाग कमी होण्यासही मदत होते. पिंपल्स येऊन गेल्यानंतर अनेक जणींच्या चेहऱ्यावर काळपट डाग राहतात. ते डाग काढून टाकण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. 3 / 8हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे दही घ्या. 4 / 8दह्यामध्ये एक चमचा ज्येष्ठमधाची पावडर टाका. ज्येष्ठमधामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटक असतात. त्यामुळे तो त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठीही जेष्ठमधाची मदत होते.5 / 8आता या मिश्रणात एक चमचा कॉफी पावडर घाला. यामुळे त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरते. 6 / 8या मिश्रणात एक चमचा मध घालायलाही विसरू नका. मधामुळे त्वचेतलं नॅचरल मॉइश्चर टिकून राहाते आणि त्वचेवर छान चमक येते.7 / 8आता सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा. चेहरा धुऊन कोरडा करून घ्या आणि हा घरगुती फेस पॅक चेहऱ्याला लावा.8 / 8यानंतर २० मिनिटांनी फेस पॅक सुकायला लागला की हळुवार हाताने मसाज करून चेहरा धुऊन फेसपॅक काढून टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळ नियमितपणे करून पाहा. वांगाचे डाग, पिगमेंटेशन कमी झालेले दिसेल.