1 / 7काही अपवाद सोडले तर बहुतांश महिला अशा असतात ज्यांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळच मिळत नाही. किंवा कधीकधी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची इच्छा होत नाही.2 / 7अशावेळी पुढे सांगितलेले काही साधे सोपे उपाय तुम्हाला त्वचेचं साैंदर्य खुलविण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त काही थेंब खोबरेल तेल आणि आपल्याच घरात असणारे इतर पदार्थ लागणार आहेत. ते उपाय नेमके कशासाठी आणि कसे करायचे ते पाहूया..3 / 7जर नाकावर, ओठांच्या आजुबाजुला, हनुवटीवर व्हाईटहेड्स किंवा ब्लॅक हेड्स वाढले असतील तर साखर आणि खोबरेल तेल एकत्र करून त्या भागावर चोळा. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स निघून जातील.4 / 7जर डोळ्यांभोवती काळी वर्तुुळे वाढली असतील किंवा डोळ्यांभोवती बारीक सुरकुत्या दिसायला लागल्या असतील तर नारळाचं तेल आणि कॉफी पावडर एकत्र करून हलक्या हाताने मसाज करा. बारीक सुरकुत्या, डार्क सर्कल्स कमी होतील.5 / 7चेहऱ्यावर खूप ओपन पोअर्स दिसत असतील तर खाेबरेल तेल आणि कॉफी पावडर एकत्र करून त्याने त्वचेला मालिश करा. त्वचा टाईट होऊन पोअर्स कमी दिसतील.6 / 7त्वचा खूप कोरडी पडली असेल आणि टॅन झाली असेल तर खोबरेल तेल, चिमूटभर हळद आणि थोडंसं बेसन एकत्र करून त्याने त्वचेला मालिश करा. डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचा छान मुलायम होईल.7 / 7ओठ खूप काळवंडले असतील तर खोबरेल तेल आणि साखर एकत्र करून ओठांवर चोळा. ओठ छान गुलाबी होतील.