1 / 7पिगमेंटेशन, टॅनिंग, पिंपल्स अशा त्वचेशी संबंधित बऱ्याच तक्रारी दूर करण्यासाठी बेसनाचे पीठ अतिशय उपयुक्त ठरते. 2 / 7त्यामुळेच बेसन पिठाचे हे काही उपयोग माहिती करून घ्या. तुम्हाला त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारच्या कॉस्मेटिक्सची गरज पडणार नाही.3 / 7जर त्वचेवर काळसर डाग किंवा पिगमेंटेशन असेल तर बेसन आणि दही एकत्र करा आणि या मिश्रणाने आठवड्यातून २ ते ३ वेळा चेहरा धुवा. पिगमेंटेशन कमी होईल.4 / 7सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे टॅनिंग खूप जास्त होतं. ते काढून टाकण्यासाठी बेसन आणि लिंबाचा रस हे मिश्रण त्वचेवर लावा. टॅनिंग कमी होऊन त्वचा उजळण्यास मदत होईल.5 / 7त्वचेवर कमी वयातच सुरकुत्या येऊ नये यासाठी बेसन आणि हळद पाण्यात किंवा दुधात कालवून नियमितपणे चेहऱ्याला लावावे. 6 / 7त्वचेवर चमक येण्यासाठी बेसन आणि कच्चं दूध यांचा फेसपॅक खूप उपयुक्त ठरतो.7 / 7चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येत असतील तर बेसन, मध आणि लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. पिंपल्स येण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल. ही माहिती आरोग्यम् सर्वे सन्तु निरामया या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे.