1 / 5बऱ्याचदा असं होतं की आपली त्वचा खूप डल वाटू लागते. त्वचेचा ड्रायनेसही वाढायला लागतो. त्वचेवरचा ग्लो निघून जातो आणि ती अगदी निस्तेज दिसायला लागते.(home hacks to get rid of dull and dry skin)2 / 5असं झालं की आपण महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करायला जातो. ते केल्याने २- ३ दिवस त्वचा छान तर दिसते, पण पुन्हा पहिल्यासारखीच होऊन जाते. मग उगाच पैसे वाया गेले असं वाटायला लागतं.3 / 5म्हणूनच आता हा एक अगदी सोपा उपाय पाहा. हा उपाय अगदी चकटफू असून त्यासाठी तुम्हाला अजिबातच वेगळे पैसे खर्च करण्याची गरज नाही.4 / 5आता बऱ्याचदा आपण केळी विकत आणतो. केळी खातो आणि त्याचे साल मात्र टाकून देतो. पण कचरा वाटणारे हे साल त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतात. हे साल आतल्या बाजुने त्वचेवर चोळा आणि ५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये निश्चितच छान बदल जाणवेल.(how to use banana peel for glowing skin?)5 / 5दुसरा उपाय तुम्ही असाही करू शकता की केळीच्या सालाच्या आतल्या बाजुवर थोडी कॉफी पावडर आणि थोडी पिठीसाखर घाला. त्यावर थोडं लिंबू पिळा आणि हे साल तुमच्या चेहऱ्यावर चोळा. पिठीसाखर, कॉफी, लिंबू आणि केळी यांचा एकत्रित परिणाम तुम्हाला त्वचेवर जणू जादू करेल. एकदा हा प्रयोग करून बघाच..