1 / 7आपण दिवसभर त्वचेची काळजी घेतो परंतु, रात्री झोपताना देखील त्वचेची काळजी घ्यायला हवी. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर काय लावतो हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.(golden glow face pack) 2 / 7त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर त्वचा चमकदार होत नाही. त्यासाठी झोपण्यापूर्वी हळदीत कच्चे दूध मिसळून त्वचेवर लावा. (Bridal glow face pack at home)3 / 7कच्चे दूध आणि हळदी त्वचेवर लावल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळून त्वचेतील घाण साफ होते. 4 / 7३ चमचे कच्च्या दूधात चिमूटभर हळद पावडर घालून त्याची पेस्ट तयार करा. हे चेहऱ्यावर लावून सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर रात्रभर चेहऱ्यावर तसेच राहू द्या. 5 / 7सकाळी उठल्यानंतर ओल्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. नंतर पाण्याने चेहरा धुवून, हळदी आणि दूधाचे मिश्रण लावू शकता. 6 / 7कच्चे दूध त्वचेवर लावल्याने ती मऊ होते. दुधात असणारे घटक त्वचेला पोषण देतात. ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. 7 / 7हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात जे त्वचा उजळण्यास मदत करतात.