Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फक्त अर्धा टोमॅटो बघा कसं खुलवतो तुमचं सौंदर्य.. 'हा' घरगुती मास्क लावून पाहा- त्वचा होईल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 14:03 IST

1 / 6
टोमॅटो आपल्या जेवणात जशी रंगत आणतो, आपल्या आरोग्यासाठी जसा चांगला असतो, तसाच तो आपल्या त्वचेसाठीही खूप उपयुक्त ठरतो. कारण त्वचेच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो.
2 / 6
आता हेच पाहा ना उन्हामुळे तुमची त्वचा काळवंडली असेल किंवा फ्रेश वाटत नसेल तर टोमॅटोचा वापर करून त्वचेची हरवलेली चमक पुन्हा परत मिळवता येते.(tomato face mask for skin brightening)
3 / 6
त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा. हा उपाय करण्यासाठी अर्धा टोमॅटो घ्या आणि तो किसून त्याचा रस काढून घ्या (how to use tomato for skin care?). टोमॅटोमध्ये असणारं लायकोपीन युव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतं.
4 / 6
आता टोमॅटोच्या रसामध्ये थोडं दही घाला. दह्यामध्ये असणारं लॅक्टीक ॲसिड त्वचेला पोषण देतं आणि त्वचेला छान हायड्रेटेड ठेवतं. यामुळे त्वचा मऊ, कोमल होते.
5 / 6
आता शेवटी यात चिमूटभर हळद घाला. हळदीतले ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटे तसाच राहू द्या.
6 / 6
त्यानंतर चेहरा मसाज करून स्वच्छ धुवा आणि त्वचा मॉईश्चराईज करा. त्वचा एकदम फ्रेश झालेली दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीटोमॅटोहोम रेमेडी