Join us

त्वचेसाठी बेसन फायदेशीर पण ‘या’ लोकांनी मुळीच बेसनाचे लेप लावू नयेत, कायमचं नुकसान होतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 17:21 IST

1 / 8
'बेसन' हे त्वचेसाठी फारच उपयुक्त मानले जाते. त्वचेला बेसन (These People Should Not Use Besan For Skin Care) लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊन, त्वचा उजळ व चमकदार दिसू लागते.
2 / 8
यासाठीच आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती फेसमास्क किंवा (Know the side effects of using besan on face) फेसपॅकमध्ये हमखास बेसनाचा वापर करतो.
3 / 8
परंतु बेसन हे सगळ्यांजणींच्या त्वचेला सूट होईलच असे नाही. यासाठीच, त्वचेसाठी बेसन वापरणे कितीही फायदेशीर असले तरीही ते कुणी वापरु नये ते पाहूयात.
4 / 8
जर तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर बेसन चुकूनही वापरु नका. बेसन त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे कोरडेपणा आणखी वाढू शकतो. अशावेळी एलोवेरा जेल, दही किंवा ओट्ससारखे पदार्थ त्वचेसाठी वापरणे योग्य ठरते.
5 / 8
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेसाठी बेसनाचा वापर करु नका. बेसनामुळे त्वचेला खाज, लालसरपणा किंवा एलर्जी होण्याची शक्यता असते.
6 / 8
त्वचेवर भरपूर प्रमाणात पिंपल्स आणि अ‍ॅक्ने असतील तर त्वचेसाठी बेसनाचा वापर करु नका. बेसन त्वचा कोरडी करून पिंपल्स आणि अ‍ॅक्नेची स्थिती अधिक बिघडवू शकते.
7 / 8
जर आपण त्वचेवर कोणत्याही प्रकारची विशेष स्किन ट्रीटमेंट घेत असाल तर बेसन वापरू नका. अशा परिस्थितीत, त्वचा अधिक संवेदनशील होते आणि बेसनमुळे इरिटेशन होऊ शकते.
8 / 8
जर तुमची त्वचा पिगमेंटेड झाली असेल तर अशा त्वचेवर अजिबात बेसन लावू नका. बेसनमुळे त्वचा कोरडी होऊन पिगमेंटेशन आणखी वाढू शकते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी