दात पिवळे, दातांवरचा पिवळट थर हसताना दिसतोच? ५ उपाय, दात दिसतील स्वच्छ-कीड लागणार नाही
Updated:May 2, 2025 17:00 IST2025-05-02T16:53:14+5:302025-05-02T17:00:58+5:30
the yellow layer on the teeth is visible when you smile? 5 solutions, teeth will look clean : दात सारखे पिवळे पडतात. मग काही उपाय करुन बघा. नक्की फरक जाणवेल.

बोलताना किंवा हसताना नजर आपसुकच दातांवर जाते. दातांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी सगळ्यांचे दात छान दुधाळ पांढरेच असतात. दात पिवळे पडतात त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र असे पिवळे झालेले दात विचित्र दिसतात.
फक्त दिसायलाच पिवळे दात वाईट नसतात. दात पिवळे दिसतात कारण त्यावर थर जमा झाला असतो. त्यामुळे दात फक्त घाण दिसत नाहीत खराबही होतात. त्यामुळे दात पिवळे होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असते.
काही गोष्टींची काळजी घेतली तर दातांचा पिवळटपणा कमी करता येतो. काही सवयी लावून घ्या म्हणजे दात खराबही होणार नाहीत. किडणारही नाहीत.
मोहरीचे तेल हाडांसाठी उपयुक्त असते. तसेच दातांसाठीही फायद्याचे असते. मीठ व मोहरीचे तेल याची पेस्ट करायची आणि दातांना लावायची दातांचा पिवळेपणा कमी होतो.
सकाळी उठल्यावर दात घासणे जेवढे गरजेचे असते तेवढेच रात्री झोपताना दात स्वच्छ करणे गरजेचे असते. चांगल्या दर्जाचा ब्रश दातांसाठी वापरा. तसेच वेळोवेळी ब्रश बदला.
सकाळी व संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायची सवय आपल्याला असते. तसेच ज्यूस, सरबत आपण पितो. ते पिऊन झाल्यावर चुळ भरायला विसरू नका.
माऊथवॉशने तोंड धुवायचे. चांगली खळखळून चुळ भरा. अन्नाचा थर दातांवर तयार होणार नाही. याची काळजी घ्या.
सफरचंद, संत्र अशी फळे खा. दात स्वच्छ होण्यासाठी ही फळे उपयुक्त असतात. तसेच गाजर खा. इतरही फळे खाणे दातांसाठी चांगले असते. अन्नरसाचा थर कमी करतात.