Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात चेहऱ्याला चुकूनही लावू नका ६ गोष्टी, येतील भरपूर पिंपल्स-डाग, वाढेल वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2026 18:00 IST

1 / 8
उन्हाळा सुरु झाला की आपल्याला संपूर्ण आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हा काळ कडक ऊन आणि वाढती आर्द्रतेचा असतो. या दिवसांत त्वचेवर सतत घाम आणि धुळीमुळे पिंपल्स किंवा रॅशेस येणं सामान्य असतं. पण या त्रासातून सुटण्यासाठी आपण स्वयंपाकघरातील काही चुकीची उत्पादने चेहऱ्यावर लावतो. ज्यामुळे त्वचा खराब होते. (Gharghuti upay for skin)
2 / 8
अनेकांना त्वचेवर पिंपल्स किंवा डाग पडल्यानंतर काही सोपे घरगुती उपाय करुन पाहायचे असतात. पण हे उपाय दिसायला सोपे असले तरी त्वचेचं नुकसान करतात. पाहूयात त्वचेवर कोणते पदार्थ लावू नये. (Summer skin care tips Marathi)
3 / 8
लिंबूमध्ये आम्लयुक्त घटक असतात. उन्हात गेल्यानंतर त्वचेवर लिंबाचा रस राहिल्यास सूर्यप्रकाशामुळे 'फायटोफोटोडर्माटायटीस' होऊ शकते. ज्यामुळे त्वचा काळी पडते आणि फोड येतात.
4 / 8
बेकिंग सोड्यामध्ये PH लेव्हल जास्त असतो. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर कमी होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी पडून पिंपल्स भरपूर येतात.
5 / 8
अनेकांना पिंपल्सवर टूथपेस्ट लावण्याची सवय असते. पण टूथपेस्टमध्ये असलेले घटक त्वचेची जळजळ कमी करतात आणि त्यामुळे त्वचेवर डाग पडतात.
6 / 8
उन्हाळ्यात चेहऱ्यावर गरम किंवा कोमट पाण्याचा वापर टाळा. हे आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते आणि पिंपल्स जास्त येतात.
7 / 8
काही लोकांची त्वचा ही ओपन पोअर्स बंद करणारी असते. उन्हाळ्यात घाम आणि खोबरेल तेल एकत्र आल्यास ओपन पोअर्स बंद होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर लहान पांढरे दाणे किंवा पुरळ येतात.
8 / 8
अल्कोहोल किंवा अति सुगंधी घटक उन्हाळ्यात त्वचेवर वापरणं टाळा. उन्हाचा परिणाम त्वचेवर जास्त होतो. यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि खाज येते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल