1 / 7उन्हाळा सुरु झाला की आपल्या त्वचेच्या तक्रारी अधिक वाढतात. बाहेर पडल्यावर काही मिनिटांतच चेहरा काळा पडतो. तेलकटपणामुळे पिंपल्स येतात आणि त्वचेची आग होऊ लागते. यासाठी फक्त ऊन नाही तर आपल्या काही रोजच्या सवयींमुळे त्वचेचे नुकसान होते. (Unhalyat cheharyachi kalji)2 / 7उन्हाळ्यात आपलीही त्वचा काळी पडते. आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात. पण वेळीच सावध होऊन 'या' ५ सवयी बदलल्या, तर उन्हाळा संपल्यानंतरही आपला चेहरा काळवंडलेला न दिसता अधिक उजळले. (Cheharyache nuksan karnarya chuka)3 / 7उन्हाळ्यात अनेकदा घराबाहेर पडताना आपण सनस्क्रीन लावत नाही. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होते. ज्यामुळे टॅनिंग, सनबर्न आणि पिग्मेंटेशनचा त्रास होऊ शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी १५ ते २० मिनिटांआधी SPF-30 किंवा 50 असलेली सनस्क्रीन लावा. 4 / 7उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येतो. अनेकदा आपण वारंवार फेश वॉश करतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे त्वचा कोरडी होते. फेसवॉश कितीही चांगला असला तरी, त्यात अशी काही रसायने असतात. जी आपल्या त्वचेतील ओलावा कमी करतात. त्यासाठी दिवसातून फक्त २ ते ३ वेळा फेसवॉश वापरा. 5 / 7उन्हाळ्यात आपल्याला भरपूर घाम येतो. ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. जर आपण दिवसभर पुरेसे पाणी प्यायले नाही तर त्वचेवर परिणाम होतात. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. पाणी पिण्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहिल आणि त्वचा उजळेल. 6 / 7उन्हाळ्यात जास्त मेकअप करणं टाळा. यामुळे मुरुमांची समस्या वाढते. या ऋतूमध्ये हलके आणि नॉन- कॉमेडोजेनिक मेकअप उत्पादने वापरा. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करा. मेकअप लावून झोपल्यानंतर मुरुमे येतात. 7 / 7या ऋतूमध्ये त्वचेला मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे. मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात हलके, जेल-आधारित मॉइश्चरायझर निवडणं चांगला पर्याय आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावा.