Join us

केसांना टोकदार फाटे फुटलेत-विचित्र दिसतात? तेलात ५ पदार्थ मिसळून लावा-केस होतील रेशमासारखे मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2025 17:35 IST

1 / 7
ऋतू बदलला की केसांचा कोरडेपणा वाढतो. ज्यामुळे केस अधिक रुक्ष होतात आणि केसांना फाटे फुटू लागतात. या केसांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण विविध प्रकारचे शाम्पू, कंडिशनर आणि मास्क वापरतो. परंतु ही समस्या तशीच राहते. (Hair fall and split ends treatment)
2 / 7
घरी बनवलेले मास्क केसांच्या कूपांना मजबूत करते. केसांना पोषण देण्यास मदत करते. यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. जर आपल्याही केसांना फाटे फुटत असतील तर हे घरगुती उपाय करुन पाहा. (Damaged hair repair tips)
3 / 7
नारळाच्या तेलात लॉरिक अ‍ॅसिड आणि अँटी-मायक्रोबियल असल्यामुळे मुळांची ताकद वाढते. त्यासाठी तेलात कडीपत्ता शिजवून थंड करुन याचे तेल केसांना लावा. मुळ मजबूत होण्यास मदत होईल.
4 / 7
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते. जे केसांना मॉइश्चरायझ करते. केळीमध्ये असलेले सिलिकॉन घटक केसांचा रखरखीतपणा कमी करते. यासाठी केळी मॅश करुन त्यात ऑलिव्ह ऑइल घाला. ३० मिनिटे केसांना लावा, नंतर केस शाम्पूने धुवा.
5 / 7
कांद्याचा रस हा केसांच्या मुळांना मजबूत करतो. तर मेथीच्या बियांमध्ये प्रथिने आणि लोह असते, जे केसांचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्याची पेस्ट तयार करा. आणि त्यात कांद्याचा रस घालून केसांना लावा.
6 / 7
केसांना मऊमुलायम करण्यासाठी दह्यात बेसनाचे पीठ मिसळवून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा. यामुळे फाटे फुटणाऱ्या केसांची समस्या कमी होईल.
7 / 7
तांदळाचे पाणी टाळूची जळजळ रोखण्यास मदत करते. तसेच फाटे फुटलेल्या टोकांची समस्या दूर करते. केसांच्या वाढीसाठी तांदळाच्या पाण्यात कोरफडीचा गर मिक्स करुन स्प्रे तयार करा. केस धुण्यापूर्वी ३० मिनिटे लावा.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी