1 / 10१. रोजच्या गडबडीत त्वचेकडे मुळीच लक्ष देणं होत नाही. त्यामुळे मग हळूहळू त्वचा निस्तेज, कोरडी दिसू लागते. कधी कधी असं वाटतं की त्वचेचा सगळाच ग्लो गेला आहे.2 / 10२. त्वचेची अशी अवस्था झाली की सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की आपलं त्वचेकडे खूप जास्त दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्वचेचा पोत बिघडून जातो आणि मग त्वचा निस्तेज, डल दिसू लागते.3 / 10३. जेव्हा त्वचा रुक्ष, कोरडी होऊन जाते, तेव्हा आपण सरळ पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेण्याचा विचार करतो. पण त्यासाठी वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी घालविण्याआधी त्वचेला एकदा घरच्याघरी ऑईल मसाज देऊन बघा. हा घरगुती उपाय देखील तुमची त्वचा पुन्हा चमकदार बनवू शकतो. 4 / 10४. चेहऱ्याला ऑईल मसाज देण्यासाठी आपण सरसकट कोणतंही तेल वापरू शकत नाही. त्यामुळेच पुढील ५ प्रकारच्या तेलांपैकी तुमच्या त्वचेला सुट होणारं कोणतंही एक तेल घ्या आणि मसाज करा. सगळेच तेल सूट होत असतील तर आठवड्यातून एकदा आलटून पालटून प्रत्येक तेलाने मसाज करून बघा. 5 / 10५. ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. त्यामुळे हे तेल त्वचेला अधिक सुंदर आणि तरुण बनविण्यासाठी उपयुक्त ठरतं. या तेलाच्या नियमित मसाजमुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. त्वचेला एक प्रकारचा टाईटनेस येतो.6 / 10६. बदामाच्या तेलात असलेले व्हिटॅमिन ए, बी आणि ई त्वचेसाठी अतिशय पोषक असतात. या तेलाने नियमितपणे मसाज केल्यास त्वचेचा काळवंडलेपणा दूर होऊन त्वचा उजळ होण्यास मदत होते. त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो.7 / 10७. त्वचेवरची मृत त्वचा म्हणजेच डेड सेल्स काढून टाकण्यासाठी तिळाचं तेल उपयुक्त ठरतं. पण तिळाच्या तेलाने मसाज उन्हाळ्यात मसाज करू नये. कारण हे तेल उष्ण मानलं जातं. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वापरण्यासाठी हे तेल योग्य आहे. 8 / 10८. केसांप्रमाणेच त्वचेसाठीही मोहरीचं तेल अतिशय गुणकारी ठरतं. या तेलामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. पावसाळ्यात बऱ्याचदा त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचा संसर्ग होतो. या तेलाने मसाज केल्यास संसर्ग कमी होण्यास मदत होते. 9 / 10९. चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील तर कडुलिंबाचं तेल लावणं उपयुक्त ठरतं. 10 / 10१०. यापैकी कोणत्याही तेलाने चेहऱ्याला मसाज करताना खूप जास्त तेल लावू नये. ७ ते ८ थेंब तेल पुरेसं आहे. मसाज झाल्यानंतर डाळीचं पीठ किंवा एखादं क्लिन्सर लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. धुतल्यानंतर चेहऱ्यावर तेल राहणार नाही, याची काळजी घ्यावी.