सुपरस्टार अभिनेत्रीही चेहऱ्याला लावतात ‘हे’ घरगुती लेप, जाहिरातीतल्या महागड्या क्रिम नाहीतर त्या निवडतात...
Updated:July 4, 2025 14:54 IST2025-07-04T14:40:16+5:302025-07-04T14:54:06+5:30
Skincare Secrets Bollywood Celebs Swear By You Should Follow : Deepika Padukone To Shraddha Kapoor Skincare Secrets : Bollywood Celebrity Beauty Secrets : Bollywood Beauty Secrets You Should Know And Follow : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करतात...

बॉलीवूड अभिनेत्रींना पाहिल्यावर, आपल्याला सर्वातआधी त्यांच्या चमकदार आणि सुंदर त्वचेचा फारच हेवा वाटतो. या अभिनेत्रींचा लूक कोणताही असो पण त्यांची (Skincare Secrets Bollywood Celebs Swear By You Should Follow) त्वचा कायमच फ्रेश, तजेलदार असते. दीपिका पासून श्रद्धा पर्यंत, बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री त्यांच्या त्वचेसाठी खास स्किनकेअर रूटीन फॉलो करतात.
त्वचेचे सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी त्या स्वतःला काही (Bollywood Beauty Secrets You Should Know And Follow) सवयी लावून घेतात, आणि त्या सवयीं कायम फॉलो करतात. अभिनेत्रींचे हे सिक्रेट स्किनकेअर रूटीन आणि काही चांगल्या सवयी त्यांना ग्लोइंग आणि यंग दिसायला मदत करतात.
दीपिकापासून श्रद्धापर्यंत, बॉलिवूडच्या लोकप्रिय (Deepika Padukone To Shraddha Kapoor Skincare Secrets) अभिनेत्री आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमकं काय करतात ते पाहूयात.
१. दीपिका पदुकोण :-
दीपिका त्वचेसाठी योग्य स्किनकेअर रूटीन कायम न चुकता फॉलो करते. ती दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ करते आणि हलकं मॉइश्चरायझर वापरते. तिच्या स्किनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रीनची महत्त्वाची भूमिका असते. याशिवाय, ती भरपूर पाणी पिते आणि गोड पदार्थ फारच कमी प्रमाणात खाते, ज्यामुळे त्वचा आतून निरोगी राहते. तिचा एक सोपा मंत्र आहे – क्लीन्स, टोन, मॉइश्चराइज – जो तुम्हीही नक्की फॉलो करू शकता.
२. श्रद्धा कपूर :-
श्रद्धा कपूर हिला त्वचेसाठी घरगुती व नैसर्गिक उपाय करायला आवडतात. ती त्वचेसाठी एलोवेरा जेल, गुलाबपाणी आणि मुलतानी माती वापरणे यासारखे घरगुती उपाय करते. तसेच चेहऱ्यावर ती कडुलिंबाच्या पानांचा पॅक आणि टोमॅटोच्या रसाचा वापरही करते. तिचा विश्वास आहे की त्वचेला कमीत कमी केमिकल्सने ट्रीट करावं. ती रोज योग करते आणि हेल्दी डायटमधून त्वचेला आतून पोषण मिळवून देते.
३. आलिया भट :-
आलिया त्वचेला हायड्रेट ठेवण्यावर खूप भर देते. ती पाणी व नारळपाणी पिऊन त्वचेला सतत हायड्रेट ठेवते. शक्य तितका कमी मेकअप करते. झोपण्यापूर्वी मेकअप नक्की काढते आणि आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करते. सुंदर त्वचेसाठी ती पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवण्याचा साधासोपा फॉर्म्युला वापरते.
४. करीना कपूर :-
करीनाची त्वचा नेहमीच क्लियर, उजळ आणि फ्रेश दिसते. ती आठवड्यातून एकदा फेस ऑइलने त्वचेचा मसाज करते आणि फेसपॅकमध्ये बेसन व दही वापरते. याचबरोबर, ती पुरेशी ७ ते ८ तासांची झोपही घेते. करीनाच्या मते, स्ट्रेस फ्री राहणे आणि मानसिक शांतता राखणे या गोष्टी देखील त्वचेला नैसर्गिक तेज मिळवून देण्यास मदत करतात.
५. जान्हवी कपूर :-
जान्हवी मॉडर्न स्किनकेअर प्रॉडक्ट्ससोबतच घरगुती उपायही फॉलो करते. ती सॅलिसिलिक अॅसिड बेस्ड फेस वॉश वापरते आणि आठवड्यातून दोनदा फेसमास्क लावते. यासोबतच, तिच्या आजीने सांगितलेला घरगुती उपाय, जसं हळद आणि दूधाचा फेसपॅक, देखील वापरते. तिच्या स्किनकेअर रुटीनमध्ये त्वचा कायम स्वच्छ ठेवणे आणि नियमित एक्सरसाइज करणे यांसारख्या चांगल्या सवयी कायम फॉलो करते.
६. बॉलिवूड अभिनेत्री स्वतःच स्किनकेअर रुटीन कायमच फॉलो करतात. त्यांच्याप्रमाणेच आपण देखील सर्वातआधी स्वतःचा स्किन टाइप ओळखून, आणि त्यानुसार क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शनचं रूटीन ठरवा. रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या, भरपूर पाणी आणि बॅलेन्स डाएट हेच तुमच्या त्वचेसाठी उत्तम ब्यूटी टॉनिक ठरेल.