Join us
Daily Top 2 Weekly Top 5

महागड्या क्रीम्सला करा 'बाय-बाय'; ग्लोइंग आणि पिंपल फ्री त्वचेसाठी ट्राय करा 'स्किन फास्टिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:30 IST

1 / 8
आजकालची धावपळीची जीवनशैली आणि बदलत्या सवयींमुळे अनेक तरुणी आपल्या त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असतात. अनेक स्किन केअर उत्पादने वापरूनही त्वचेच्या समस्या दूर होत नाहीत.
2 / 8
सध्या सोशल मीडियावर 'स्किन फास्टिंग' हा प्रकार खूप ट्रेंड होत आहे आणि अनेक ब्युटी ब्लॉगर्सही हे करत आहेत. त्वचा चमकदार आणि पिंपल फ्री करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. जर तुम्हीही त्वचेच्या समस्यांनी त्रस्त असाल तर एकदा हा ट्रेंड नक्की वापरून पाहू शकता.
3 / 8
तुमच्यापैकी अनेकांना या ट्रेंडबद्दल माहिती नसेल. आपण आपल्या रोजच्या स्किन केअर रूटीनमध्ये अनेक प्रकारची उत्पादने वापरतो. सततच्या मेकअपमुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते.
4 / 8
चेहऱ्यावर खाज सुटणं, जळजळ होणे आणि पिंपल्स येणं अशा समस्या उद्भवतात. या सर्व उत्पादनांपासून काही काळ ब्रेक घेऊन त्वचेला नैसर्गिक अवस्थेत राहू देणं म्हणजेच 'स्किन फास्टिंग' होय.
5 / 8
जर तुम्ही 'स्किन फास्टिंग' केलं, तर त्वचेला नैसर्गिकरीत्या ऑक्सिजन मिळतो. यामुळे त्वचा विविध केमकल प्रोडक्टच्या दुष्परिणामांपासून स्वतःचा बचाव करते आणि अधिक टवटवीत दिसते.
6 / 8
सतत केमिकल्स वापरल्याने त्वचेचा नैसर्गिक समतोल बिघडतो. केवळ २-३ दिवस स्किन फास्टिंग केल्याने त्वचेची पीएच लेव्हल मेंटेन राहण्यास मदत होते.
7 / 8
स्किन फास्टिंग केल्याने पिंपल्सच्या समस्येपासून कायमची सुटका मिळू शकते. यामुळे चेहऱ्याची नैसर्गिक चमक वाढते आणि डाग कमी होण्यास मदत होते.
8 / 8
सतत मेकअपमध्ये राहिल्याने त्वचेची नैसर्गिक छिद्र बंद होतात. जेव्हा तुम्ही स्किन फास्टिंग करता, तेव्हा त्वचेला स्वतःहून बरं होण्याची संधी मिळते.
टॅग्स : ब्यूटी टिप्स