Join us

उन्हाळा की पावसाळा, बदलत्या हवेने त्वचा निस्तेज-कोरडी पडली? १ सोपा उपाय-चेहरा चमकेल रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 19:05 IST

1 / 7
सध्या वातावरणातील बदलामुळे आरोग्यासोबत त्वचेचे देखील नुकसान होत आहे. यामुळे त्वचा टॅन होण्यासोबतच अधिक कोरडी आणि ड्राय होते आहे. (Dull and dry skin remedies)
2 / 7
ऊन-पावसाच्या खेळामुळे त्वचा टॅन होणे, तेलकट होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी महागड्या उत्पादनांचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. (Home remedies for glowing skin)
3 / 7
अशावेळी महागडे उत्पादने वापरण्याऐवजी आपण घरगुती उपाय केल्यास त्वचेच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होईल.
4 / 7
आपली त्वचा खूप नाजूक असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा त्याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कच्चे दूध लावा. यामुळे त्वचेचा रंग सुधारेल.
5 / 7
त्वचा कोरडी आणि निस्तेज होत असेल तर नियमितपणे कच्चे दूध लावा. हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करेल. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने कच्चे दूध लावा. यामुळे त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.
6 / 7
कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या, काळे डाग, बारीक रेषा किंवा वृद्धत्वाची लक्षणे जाणवत असतील तर नियमितपणे चेहऱ्यावर कच्चे दूध लावायला हवे.
7 / 7
वातावरणातील बदलामुळे अनेकदा चेहऱ्यावर पुरळ, उष्माघात, फोड यांसारख्या समस्या दिसून येतात. यामुळे चेहऱ्यावर रॅशेस आणि ऍलर्जीची समस्या वाढते. अशावेळी कच्चे दूध लावल्यास आराम मिळतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी