1 / 6हिवाळ्याच्या दिवसात त्वचा खूप जास्त कोरडी होते. त्यामुळे कधी कधी आपण नेहमी वापरत असणारे फेसवॉशही त्वचेला सहन होत नाहीत.2 / 6म्हणूनच हिवाळ्यात असं फेसवॉश हवं जे तुमची त्वचा तर स्वच्छ करेलच पण तिला व्यवस्थित हायड्रेटेड, मॉईश्चराईजही करेल.3 / 6असंच फेसवॉश घरच्याघरी कसं तयार करायचं ते पाहूया.. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मुलतानी माती घ्या आणि त्यात चिमूटभर हळद घाला.4 / 6यानंतर त्यामध्ये एक चमचा ॲलोव्हेरा जेल आणि एक चमचा ग्लिसरीन घाला. ग्लिसरीनमुळे त्वचा काेरडी पडत नाही तसेच ॲलोव्हेरा जेलही त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. 5 / 6आता या मिश्रणात २ चमचे बेबी लिक्विड सोप आणि थोडं गुलाबपाणी घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर एका स्प्रे बॉटलमध्य भरून ठेवा.6 / 6सकाळ- संध्याकाळ हेच लिक्विड वापरून चेहरा धुवा. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.