Join us

मुलतानी मातीत कालवून 'हा' पदार्थ चेहऱ्याला लावा! भरपूर पिंपल्स- पिगमेंटेशन-डाग होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2025 09:05 IST

1 / 7
उन्हाळ्यात आपली त्वचा अधिक कोरडी होते. ज्यामुळे त्वचा तेलकट होते. यामुळे चेहऱ्यावर सतत मुरुमे येण्याचा त्रास वाढतो. (best face pack for pigmentation and acne)
2 / 7
आपल्यालाही चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत असतील तर हा घरगुती उपाय करुन पाहा. काही घरगुती उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. ज्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही. (how to use multani mitti for dark circles)
3 / 7
कापूरचा वापर चेहऱ्यासाठी करता येतो. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आपल्या त्वचेवरील डाग आणि मुरुमे काढून टाकण्यास मदत करतात. तसेच त्वचेचा रंग सुधारतात.
4 / 7
कापूरचा फेस पॅक बनवण्यासाठी अर्धा चमचा कापूरचा पावडर, १ चमचा मुलतानी माती, १ चमचा नारळाचे तेल आणि गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा.
5 / 7
हा फेस पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
6 / 7
कापूर फेसपॅकमध्ये त्वचेसाठी फायदेशीर असणाऱ्या घटकांचा वापर केला जातो. मुलतानी माती चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्याचे काम करते. नारळाचे तेल त्वचेला पोषण देते तर गुलाब पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते.
7 / 7
आपल्याला प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टी त्वचेवर लावण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करायला विसरु नका.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी