Join us

फाउंडेशन लावलं की अनेकींचा चेहरा खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो? पाहा फाउंडेशन परफेक्ट लावण्याची भन्नाट ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 13:52 IST

1 / 7
फाउंडेशन म्हणजे मेकअपचा बेस. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी मेकअप करण्यापुर्वी आपण चेहऱ्यावर फाउंडेशन आवर्जून लावतोच.(simple trick to make your foundation water proof)
2 / 7
आता बहुतांश जणींना असा अनुभव येतो की फाउंडेशन लावल्यानंतर चेहरा खूपच भुरकट दिसतो, चेहऱ्यावर पॅचेस आल्यासारखे दिसतात. असं होऊ नये म्हणून काय करावं यासाठी एक खास ट्रिक...(how to avoid patches on face after applying foundation?)
3 / 7
सगळ्यात आधी तर चेहरा व्यवस्थित धुवून तो छानपैकी मॉईश्चराईज करून घ्या.
4 / 7
यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे आहे तेवढं फाउंडेशन एका स्टीलच्या ताटलीवर घ्या आणि त्यावरून बर्फाचा तुकडा फिरवा.
5 / 7
बर्फाच्या थंडपणामुळे फाउंडेशन थोडे घट्ट होईल, त्यावरचे अतिरिक्त पाणी काढून टाका आणि हे फाउंडेशन चेहऱ्याला लावा.
6 / 7
ब्लेंडरने किंवा ब्रशने चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड करा. त्यानंतर ते २ ते ३ मिनिटे चेहऱ्यावर छान सेट होऊ द्या आणि त्यानंतर पुढचा मेकअप करा. तुमचा मेकअप अगदी नॅचरल दिसेल.
7 / 7
याशिवाय तुमचं फाउंडेशन वॉटरप्रुफ होऊन ते जास्त वेळ चेहऱ्यावर छान टिकून राहील. हा उपाय swatches_by_neha या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी