Join us

स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 17:09 IST

1 / 9
वयाच्या ७० व्या वर्षी देखील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha Skincare Routine) यांचं आरस्पानी सौंदर्य आहे. त्यांचे देखणं रुप आणि उत्तम फिटनेस यासाठी आजही त्या बॉलिवूडमध्ये तितक्याच (Rekha Skincare Routine At The Age Of 70 Years) लोकप्रिय आहेत. आजच्या तरुण अभिनेत्रींना देखील लाजवेल असं नितळ सौंदर्य.... वयाची सत्तरी उलटली तरी देखील त्यांचं सौंदर्य आजही त्यांच्या असंख्य चाहत्यांना भुरळ पाडणारे असेच आहे...
2 / 9
वाढत्या वयासोबत त्यांचे चाहतेही वाढत आहेत, ही खरी त्यांच्या सौंदर्याची (Rekha swears by these beauty rituals for glowing skin at 70) गंमत आहे. त्यांची फक्त फॅशनच नाही तर, सौंदर्य आणि फिटनेस यांच्या चर्चा आजही तितक्याच रंगतात...
3 / 9
या वयातही रेखा यांनी त्यांचं सौंदर्य कसं जाेपासलं आहे, नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे त्यांंची त्वचा आजही एवढी सुंदर, चमकदार आणि विशेष म्हणजे तरुण टवटवीत कशी दिसते, असा प्रश्न अनेकींना पडतो. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीत, त्यांच्या सौंदर्याचं आणि चमकदार त्वचेच सिक्रेट सांगितलं आहे. वयाच्या सत्तरीतही त्या आपल्या त्वचेची काळजी कशी घेतात ते पाहूयात.
4 / 9
रेखा शक्य तितका कमी मेकअप करण्याला प्राधान्य देतात. केमिकलयुक्त मेकअप प्रॉडक्टपासून दूर राहणेच त्यांना आवडते. मेकअप करण्यासाठी त्या शक्य तितक्या कमी केमिकलयुक्त मेकअप प्रॉडक्टस किंवा नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे अधिक जास्त पसंत करतात.
5 / 9
रेखा त्यांच्या कितीही बिझी शेड्युल मध्ये देखील त्यांचे डेली स्किनकेअर अगदी न चुकता करतात. त्या अगदी बेसिक स्किनकेअर रुटीन फॉलो करतात. यात या त्वचेचे क्लिंझिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग करतात.
6 / 9
त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्या दररोज भरपूर पाणी देखील पितात. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यामुळे शरीर आपोआपच डिटॉक्स व्हायला मदत होते. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ शरीराबाहेर जाऊन शरीर आतून शुद्ध होते. त्याशिवाय दररोज पुरेशी झोप घ्या. सातत्याने अपुरी झोप होत असेल तर तुमचं शरीर लवकर थकतं. त्याचा परिणाम त्वचेवरही होतोच.
7 / 9
त्वचेसाठी केमिकल्सयुक्त स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी त्या घरगुती फेसमास्क त्वचेला लावणे अधिक पसंत करतात. या फेसमास्कमुळे त्वचेतील अतिरिक्त तेल, सुरकुत्या, त्वचा निस्तेज होणे, पुरळ, चेहऱ्यावरील डाग यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.
8 / 9
याशिवाय रेखा यांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहानपणी त्या त्वचेसाठी साबणाऐवजी मुगाच्या डाळीचं पीठ आणि तेल यांचं एकत्रित मिश्रण वापरायच्या. याशिवाय आठवड्यातून एकदा त्वचेवर चंदनाचा लेप लावणे, पोट स्वच्छ करण्यासाठी कडुनिंबाची चटणी खाणे, एरंडेल तेल घेणे असे काही आयुर्वेदिक उपायही त्या नियमितपणे करायच्या.
9 / 9
याचबरोबर, रेखा आपले सौंदर्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी स्वतःच्या खाण्यापिण्याकडे देखील तितकेच लक्ष देतात. त्या दररोज संध्याकाळी ७: ३० वाजायच्या आत जेवण जेवतात. कारण त्यानंतर तुम्ही जे काही खाल ते सगळं पचेलच असं नाही. जेवण, योगा, व्यायाम हे सगळं शांततेत आणि वेळ राखून करा. या गोष्टी कधीही गडबडीत उरकण्याचा प्रयत्न करू नका.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीरेखाहोम रेमेडी