पालक उकडल्यानंतर त्यातील पाणी चक्क फेकून देता? फायदे वाचा, चुकून पुन्हा असं करणार नाही..
Updated:May 20, 2025 17:58 IST2025-05-20T12:56:47+5:302025-05-20T17:58:02+5:30
Spinach Boiled Water : जास्तीत जास्त महिला पालक उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात. हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण अनेकांना या पाण्याचे फायदे माहीत नसतात.

Spinach Boiled Water : पालेभाज्यांमध्ये सगळ्यात जास्त खाल्ली जाणारी भाजी म्हणजे पालक. पालक भाजी कोरडी किंवा डाळीसोबत जास्त बनवली जाते. सामान्यपणे पालक आधी उकडली जाते आणि त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं वापरली जाते. पण जास्तीत जास्त महिला पालक उकडल्यानंतर शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात. हीच सगळ्यात मोठी चूक ठरते. कारण अनेकांना या पाण्याचे फायदे माहीत नसतात. हे पाणी आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डोळ्यांसाठी फायदेशीर
पालकाचं उकडलेलं पाणी डोळ्यांसाठी फायदेशीर असतं. या पाण्यात भरपूर व्हिटामिन ए असतं, जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी थेट फायदेशीर असतं. त्यासोबतच त्यात ल्यूटिन आणि जेक्साथिनसारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे डोळ्यांच्या कोशिका मजबूत करतात.
त्वचा टाइट आणि फीट राहते
पालक उकडल्यानंतर काढलेलं गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील टॉक्सिन बाहेर निघतात. शरीरातील विषारी तत्व बाहेर निघाल्यावर चेहऱ्यावरील पिंपल्स येण्याची समस्या दूर होते. तसेच त्वचा चमकदार होते. इतकंच नाही तर हे पाणी प्यायल्यानं शरीरातील ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
पालकाच्या गरम पाण्यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि प्रोटीनसहीत अनेक पोषक तत्व असतात. जे प्यायल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो.
केस होतात मजबूत आणि सुंदर
पालकाचं उकडलेलं पाणी पायल्यानं डोक्यावरील केसांना फार फायदा मिळतो. या पाण्यात प्रोटीन आणि आयर्न असतं. ज्याने केसांची मूळं मजबूत होतात आणि केस पांढरे होण्याचा स्पीडही कमी होतो.
पोटासाठी फायदेशीर
ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी पालकाचं पाणी फार फायदेशीर असतं. याच्यामुळे त्यांचं मेटाबॉल्जिम वाढतं, ज्यामुळे पचन तंत्र योग्यपणे काम करतं. हे पाणी प्यायल्यानं बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
कसं प्यावं पालकाचं पाणी?
पालक उकडल्यानंतर त्याची पाने बाहेर काढा. शिल्लक राहिलेलं पाणी गाळून एका ग्लासमध्ये टाका. नंतर त्यातं काळं मीठ किंवा पांढरं मीठ टाका आणि नंतर हे पाणी चहासारखं एक एक घोट प्या. टेस्ट वाढवण्यासाठी यात तुम्ही थोडा लिंबाचा रसही टाकू शकता.