Join us

१०- १२ वर्षांच्या मुलांचेही केस पांढरे झालेले दिसतात, 'हा' उपाय लगेचच करा-केस पिकणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 19:11 IST

1 / 8
कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण हल्ली एवढं जास्त वाढलेलं आहे की काही शाळकरी मुलांचे केसही पांढरे झालेले दिसत आहेत.
2 / 8
एवढ्या कमी वयात केस पांढरे झाले की आपोआपच मुलांचा आत्मविश्वासही कमी होतो. शिवाय त्यांच्या बरोबरीची मुलंही त्यांना चिडवतात. त्यामुळे तो मानसिक त्रासही होतोच.
3 / 8
यावर काय उपाय करावा आणि मुलांचे केस का लवकर पांढरे होतात याविषयीची माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी tanvinavtejpanchkarma या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
4 / 8
यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत जर तुम्ही दूध- बिस्किट, चहा- पोळी असा विरुद्ध आहार वारंवार घेत असाल तर त्यामुळेही कमी वयात केस पांढरे होण्याचा त्रास होऊ शकतो.
5 / 8
याशिवाय आहार योग्य नसणं, अभ्यास किंवा इतर गोष्टींचा स्ट्रेस घेणं यामुळेही केस पांढरे होतात.
6 / 8
यावरचा उपाय म्हणजे तुमच्या केसांचं प्रमाण पाहून दोन ते तीन चमचे आवळा चूर्ण घ्या.
7 / 8
खोबरेल तेल किंवा तूप टाकून ते तव्यावर परतून घ्या. त्याचा रंग काळा होईपर्यंत ते परतावं. यानंतर ते पाण्यात कालवावं आणि केसांना लावावं.
8 / 8
२० ते २५ मिनिटे ते केसांना तसंच लावलेलं ठेवावं आणि त्यानंतर एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस धुवून टाकावे. हा उपाय केल्यास केस पिकणं बंद होतं तसेच जे केस पांढरे आहेत ते देखील नैसर्गिकपणे काळे होण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीलहान मुलं