चेहरा कधी ड्राय दिसतो कधी चिप्प तेलकट तर कधी भकभकीत? ५ पदार्थ खाणं बंद करा-पाहा चेहऱ्यावरचं चमचमतं तेज
Updated:February 3, 2026 19:53 IST2026-02-03T12:28:00+5:302026-02-03T19:53:36+5:30

काही जणांची त्वचा खूप सेन्सिटीव्ह असते. त्यामुळे उन्हापासून, थंडीपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी त्यांना त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते.
एवढंच नाही तर कोणतंही क्रिम, साबण, मॉईश्चरायजर, बॉडीलोशन, फेसमास्क, फेसपॅक लावतानाही पॅचटेस्ट घ्यावी लागते. कारण त्वचा खूप नाजूक असल्याने तिच्यावर कशाचा काय परिणाम होईल सांगताच येत नाही.
अशा लोकांनी काही पदार्थ खातानाही थोडी काळजी घ्यायला हवी. कारण काही पदार्थ पौष्टिक असले तरी सेन्सिटीव्ह त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात (people having sensitive skin should avoid 5 foods). ते पदार्थ नेमके कोणते याची डाॅक्टरांनी दिलेली माहिती ttalks.marathi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(food items should not be taken by people having sensitive skin)
त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ म्हणजे शेंगदाणा. ज्यांना त्वचेवर नेहमी खाज येते, पुरळ उठून त्वचा लालसर होते अशा लोकांनी शेंगदाणे कमी प्रमाणात खावे.
दुसरा पदार्थ आहे पोहे. ज्या लोकांना त्वचेचा कोणताही विकार असतो त्यांनी पोहे खाणं टाळायला हवं.
शेवग्याच्या शेंगा किंवा गवारच्या शेंगा खाण्याचा अतिरेकही टाळायला हवा. कारण या शेंगांमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे त्वचेला खाज येण्याचे प्रमाण वाढते आणि सेन्सिटीव्ह त्वचा असणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो.
ज्यांना ॲक्ने, पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ उठण्याचा त्रास असतो, अशा लोकांनी जास्त प्रमाणात गूळ खाणंही टाळायला हवं.