गरबा खेळताना घामाच्या धारा-मेकअप जातो वाहून? ५ टिप्स- रात्रभर मेकअप राहील जसाच्या तसा-नो टेंशन
Updated:September 26, 2025 17:10 IST2025-09-26T16:39:37+5:302025-09-26T17:10:28+5:30
best makeup tips for navratri garba: festive waterproof makeup hacks: long lasting festive makeup: जर आपणही गरबा खेळायला जात असाल आणि घामामुळे मेकअप निघून जात असेल तर या सोप्या ५ टिप्स लक्षात ठेवा.

नवरात्री म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा आणि गरबा खेळण्याचा काळ. या काळात नऊ दिवस गरबा खेळाला जातो. विविध रंगांचे ड्रेस,त्याला साजेसा असा मेकअपही केला जातो. परंतु, अनेकदा गरबा खेळल्यानंतर घाम येतो. ज्यामुळे आपला संपूर्ण लूक खराब होतो. (best makeup tips for navratri garba)
जर आपणही गरबा खेळायला जात असाल आणि घामामुळे मेकअप निघून जात असेल तर या सोप्या ५ टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे गरबा खेळल्यानंतर मेकअप राहिल जसाच्या तसा. (festive waterproof makeup hacks)
सगळ्यात आधी आपल्याला चेहरा स्वच्छ करावा लागेल. यासाठी बर्फाने मसाज करा. ज्यामुळे त्वचा फ्रेश राहिल आणि मेकअप जास्त काळ टिकेल. १५ ते २० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा हलक्या हाताने कोरडा करा.
मेकअप टिकवण्यासाठी प्राइमर लावा. मस्करा आणि आयलाइनरचे डाग डोळ्यांभोवती पडू नये म्हणून विशेषत: डोळ्यांभोवती लावा.
लिक्विड फाउंडेशन लवकर फिकट होतात. त्यासाठी मॅट बेस्ड प्रॉडक्ट निवडा. ही उत्पादने त्वचेतील तेल शोषून घेतात आणि चेहरा स्वच्छ व चमकदार ठेवण्यास मदत करतात.
नेहमी वॉटरप्रूफ आणि डाग विरहित आयलाइनर लावा. काजळसाठी जेल लाइनर हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण हे जास्त काळ टिकतो.