1 / 8श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवांचा महिना! श्रावणात (how to darken mehendi) हरतालिका, नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव यांसारखे अनेक वेगवेगळे सण मोठ्या (mehndi dark color hacks) आनंदात आणि उत्साहात साजरे केले जातात.2 / 8नागपंचमीला मुली हातावर सुंदर मेहेंदी काढतात, ती परंपराही (natural ways to darken henna) खास आहे. मेहंदीला गडद व सुंदर रंग यावा यासाठी काही खास घरगुती आणि नैसर्गिक टिप्स पाहूयात. 3 / 8१. मेहेंदी सुकल्यानंतर किमान ६ ते ८ तास हात पाण्याच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या. मेहेंदीला पूर्णपणे सुकायला वेळ द्या, हातांवरुन मेहेंदी काढण्याची घाई करू नका.4 / 8२. लिंबाचा रस आणि साखर यांचे मिश्रण एकत्रित करुन कापसाच्या बोळ्याने मेहेंदीवर लावून घ्यावे. साखर आणि लिंबाच्या रसाच्या चिकटपणामुळे मेहेंदी सुकून पडत नाही तर ती हातांवरच चिकटून राहते, यामुळे मेहेंदीचा रंग अधिक गडद येण्यास मदत होते. 5 / 8३. हातांवरील मेहंदीला गडद रंग येण्यासाठी हातांना लवंगाच्या धुराची उब देऊ शकता. यासाठी आधी मेहंदी पूर्णपणे सुकू द्या. नंतर तव्यावर लवंगा गरम करा आणि जो धूर तयार होतो, त्यावर हात धरुन ठेवा यामुळे मेहंदीचा रंग अधिक गडद आणि ठसठशीत होतो.6 / 8४. हातावरील सुकलेली मेहंदी काढण्यासाठी कधीही पाण्याचा वापर करू नका. दोन्ही हात एकमेकांवर घासून तुम्ही मेहंदी सहजपणे झटकून काढू शकता. 7 / 8५. मेहेंदी सुकल्यानंतर ती संपूर्णपणे हातांवरुन काढून घ्यावी. त्यानंतर मेहेंदीवर थोडासा बाम लावावा, यामुळे मेहेंदीचा रंग अधिक जास्त गडद होतो. 8 / 8 ६. मेहेंदीचा रंग गडद करण्यासाठी तुम्ही मेहेंदीवर कोणत्याही लोणच्यातील किंवा मोहरीचे तेल लावू शकता. यामुळे मेहेंदीचा रंग अधिक गडद होतो.