Join us

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ५ गोष्टी, कोरड्या- रुक्ष त्वचेपासून होईल सुटका, पावसाळ्यात चेहऱ्याचा ग्लो वाढतच जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 09:35 IST

1 / 7
ऋतू बदलला की, त्वचेची आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. या काळात त्वचेच्या अनेक समस्या वाढतात. पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढल्याने खाज सुटणे, फोड्या येणे, मुरुमांच्या समस्या अधिक वाढतात. (night beauty tips for face)
2 / 7
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो परंतु काही घरगुती उपाय केल्यास त्वचेचा पोत तर सुधारेलच पण त्वचेचा संसर्ग, मुरुम आणि इतर समस्यांपासून त्वचेची सुरक्षा होईल. यासाठी त्वचेचला रात्री झोपण्यापूर्वी काय लावायला हवे पाहूया. (rainy season skincare tips)
3 / 7
पावसाळ्यात कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा निरोगी राहते. कडुलिंबाची पाने एक लिटर पाण्यात उकळा. नंतर हे पाणी थंड करुन दिवसातून १ ते २ वेळा या पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
4 / 7
त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचेवर कोरफडीचे जेल लावा. यामुळे त्वचा निरोगी आणि समस्यामुक्त होते. यामुळे मुरुम आणि जळजळीपासून आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी आपण त्वचेला कोरफडीचा जेल लावू शकतो.
5 / 7
त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी आपण टोमॅटोचा रस त्वचेवर लावू शकतो. टोमॅटोच्या रसात ग्लिसरीन आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवर चमक येईल.
6 / 7
काकडीच्या रसात कोरफडीचा गर मिसळून लावल्यास त्वचेला थंडावा मिळेल. यामुळे त्वचेला होणारी जळजळ कमी होईल. इतकेच नाही तर त्वचेचा रंग देखील उजळेल.
7 / 7
गुलाबजल आणि कोरफडीचा गर मिसळून चेहऱ्यावर रात्री झोपण्यापूर्वी लावा. यामुळे त्वचा अधिक तजेलदार होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्समोसमी पाऊसत्वचेची काळजी