मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

Updated:July 7, 2025 19:23 IST2025-07-07T19:15:25+5:302025-07-07T19:23:27+5:30

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

चेहरा जर खूप डल झाला असेल, चेहऱ्यावरचं टॅनिंग वाढलं असेल तर तुमच्या त्वचेला पुन्हा एकदा चमकदार आणि उजळ करण्यासाठी हा एक सोपा उपाय लगेचच घरच्याघरी करून बघा.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

हा उपाय केल्यामुळे तुमच्या त्वचेवर एवढी छान चमक येईल की जणू काही तुम्ही एखाद्या महागड्या पार्लरमध्ये जाऊन कुठलं तरी एकदम भारी फेशियल करून आलेला आहात..

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ चमचे मसूर डाळीचे पीठ घ्या. टॅनिंग कमी करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरची डेड स्किन, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी करण्यासाठी मसूर डाळ अत्यंत उपयोगी ठरते.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

त्यामध्येच २ चमचे तांदळाचे पीठ घाला. तांदळाच्या पिठामुळे त्वचेवर इन्स्टंट ग्लो येतो आणि पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

आता त्यामध्येच १ चमचा कॉफी पावडर घाला. कॉफी पावडरमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतात.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

आता यामध्ये २ विटामिन ई कॅप्सूल आणि खोबरेल तेलाचे दोन ते तीन थेंब घाला. यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल, त्वचेवरच मॉइश्चर टिकून राहील.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

आता गुलाबजल घालून सगळं मिश्रण कालवून घ्या. हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्या.

मसूर डाळीचा फेसपॅक! १५ मिनिटांत टॅनिंग, डेडस्किन जाईल- फेशियल केल्यासारखा इंस्टंट ग्लो मिळेल

यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये खूप छान फरक पडलेला दिसेल. घाई गडबडीत असताना झटपट फेशियलसारखा ग्लो हवा असल्यास हा उपाय नक्कीच ट्राय करा. हा उपाय fitnessproud1492 या instagram पेजवर शेअर करण्यात आला आहे.