1 / 7बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने ओळखली जाते. वयाची पन्नाशी ओलांडली तरी तिच्या चेहऱ्यावर आजही नैसर्गिक तेज, चमकदार त्वचा आणि सुंदर हास्य आपल्याला पाहायला मिळतं. (Madhuri Dixit beauty secrets)2 / 7अनेकांना प्रश्न पडतो वय वाढलं तरी इतक्या वर्षांनंतरही माधुरीचं सौंदर्य टिकून कसं आहे. खरं तर माधुरी कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट्स करत नाही, तर रोजच्या काही सवयींमध्ये बदल करते. ज्यामुळे तिचा चेहरा आजही तितकाच सुंदर आहे. (Madhuri Dixit skincare routine)3 / 7माधुरी दीक्षित दिवसभरातून दोन वेळा सौम्य क्लींझरने चेहरा स्वच्छ करते. दिवसभर चेहऱ्याला कितीही मेकअप केला तरी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला हवा. त्यामुळे त्वचेवर मळ साचत नाही आणि ओपन ओपर्सही येत नाही. 4 / 7ती दिवसभरात भरपूर पाणी पिते. कधी नारळपाणी किंवा हर्बल ड्रिंक्स घेतल्यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहते. ज्यामुळे नैसर्गिक ग्लो येतो. त्वचा कोरडी पडू नये यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझरचा वापर करते. 5 / 7योगा आणि व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारतं, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि तणावही कमी होते. तणावमुक्त मन हे सुंदर त्वचेचं मोठं रहस्य आहे असं ती मानते. 6 / 7माधुरी दीक्षित जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खाणे टाळते. तिच्या आहारात रोज फळं, भाज्या, डाळी आणि घरचे अन्नपदार्थ असतात. त्वचेसाठी आवश्यक असणारे पोषकतत्वं आहारातून मिळाल्यामुळे त्वचा निरोगी राहते. 7 / 7सुंदर त्वचेसाठी पुरेशी झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. व्यस्त वेळापत्रक असूनही ती रोज किमान ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करते. झोपेमुळे त्वचेला रिपेअर होण्याची संधी मिळते आणि चेहऱ्यावर थकवा देखील दिसत नाही.