By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:14 IST
1 / 8जर तुम्ही दररोज बाईक चालवत असाल आणि हेल्मेट वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकांची अशी तक्रार असते की हेल्मेट घातल्यामुळे त्यांचे केस गळत आहेत. 2 / 8सुरक्षेसाठी हेल्मेट घालणं अनिवार्य आहे, पण खरंच यामुळे केस गळतात का? यावर तज्ज्ञांचं असं मत आहे की, दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने हेल्मेट वापरल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.3 / 8हेल्मेट हे केस गळतीचं थेट कारण बनत नाही. मात्र, बराच वेळ हेल्मेट घातल्यामुळे स्काल्पला जास्त घाम येतो. जेव्हा हा घाम बराच काळ केसांच्या मुळांशी साचून राहतो, तेव्हा मुळं कमकुवत होऊ शकतात. 4 / 8वारंवार हेल्मेट घालताना आणि ते डोक्यातून काढताना केसांवर ताण पडतो किंवा केस ओढले जातात, ज्यामुळे केस तुटण्याची समस्या निर्माण होते.5 / 8जर हेल्मेट खूप घट्ट असेल किंवा त्याची फिटिंग योग्य नसेल, त्यामुळे केस ओढले जातात. हळूहळू केस कमकुवत होऊन गळू लागतात. तसेच अस्वच्छ हेल्मेट वापरल्यामुळे स्काल्पवर बॅक्टेरिया आणि डँड्रफ होण्याची शक्यता वाढते.6 / 8केस गळती रोखण्यासाठी तुमचे केस, स्काल्प स्वच्छ ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. घाम, घाण साचू नये यासाठी नियमितपणे केस धुवावेत. याशिवाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना तेल लावल्याने पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात.7 / 8ओल्या केसांवर हेल्मेट घालू नका कारण ओले केस अधिक नाजूक असतात, त्यामुळे ते सहज तुटू शकतात. हेल्मेटच्या आत कॉटन टोपी किंवा रुमाल वापरणं उत्तम आहे. हे घाम शोषून घेतं आणि केसांना ओढले जाण्यापासून वाचवतं.8 / 8नेहमी योग्य मापाचे हेल्मेट वापरा जे डोक्यावर सहज फिट होईल. हेल्मेटला वेळोवेळी आतून साफ करत राहा, जेणेकरून त्यात साचलेली घाण आणि बॅक्टेरिया केसांचे नुकसान करणार नाहीत. हेल्मेट काढताना नेहमी सावकाश काढा, जेणेकरून केस ओढले जाणार नाहीत.