क्रिती सनॉन कशी दिसते इतकी सुंदर? तिनेच सांगितल्या ७ गोष्टी, चेहऱ्यावरचं तेज कायम वाढतं
Updated:July 10, 2025 18:37 IST2025-07-10T18:33:42+5:302025-07-10T18:37:38+5:30
Kriti Sonnen glowing skin tips: Natural beauty routine of celebrities: वाढत्या वयात क्रिती सनॉन त्वचेची काळजी कशी घेते?

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या सौंदर्यामुळे ओळखली जाते. वाढत्या वयात ती तिच्या त्वचेची विशेष काळजी घेते असं तिने म्हटलं आहे. (Kriti Sanon glowing skin tips)
तिने तिच्या एका मुलाखतीत सिक्रेट त्वचेच रहस्य शेअर केलं. अभिनेत्रीने म्हटलं की ती नियमितपणे चेहऱ्यावर काही गोष्टी लागते ज्यामुळे तिचा चेहरा चमकतो. (Natural beauty routine of celebrities)
क्रिती सनॉन तिच्या दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाणी पिऊन करते. त्यानंतर ती बर्फाच्या पाण्यामध्ये काही वेळ आपला चेहरा ठेवते. ज्यामुळे त्वचेची जळजळ शांत होते, छिद्रांमधील तेल आणि घाण साफ होण्यास मदत होते.
त्वचेला डिटॉक्सिफायिंग करण्यासाठी ती मास्क वापरते. यावेळी ती विविध हायड्रेटिंग मास्कचा वापर करते.
ग्रीन टी आणि कॅफिनयुक्त मास्कचा डोळ्यांखाली वापर करते. हा पॅच आणि मास्क त्वचेवर १५ मिनिटे ठेवते ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
टोनर बनवण्यासाठी ती ग्लिसरीन आणि गुलाबजलचा स्प्रे तयार करुन त्याचा वापर करते.यामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्यात अँटीसेप्टिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.
हायलुरोनिक अॅसिड, नियासिनमाइड, रंगद्रव्ययुक्त त्वचेसाठी अल्फा आर्बुटिन, व्हिटॅमिन सीसाठी काकारू प्लम अर्क आणि त्वचेला हायड्रेट करण्यासाठी कोरफडीचा अर्क असलेले सीरम वापरते.
मॉइश्चरायझरनंतर ती त्वचेचा सनस्क्रीन लावते. ज्यामुळे सूर्यप्रकाशापासून तिच्या त्वचेचे संरक्षण होते.