Join us
Daily Top 2 Weekly Top 5

व्हायरल झालेला Kora Turmeric Mask माहितीये का? ४ पदार्थ एकत्र करून लावा, त्वचेवर येईल अफलातून ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 13:28 IST

1 / 7
सौंदर्य जगतात नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. मध्यंतरी राईस वॉटरचा कोरियन ट्रेण्ड होता. तांदळाचं पाणी त्वचेसाठी आणि केसांसाठी किती उपयुक्त ठरतं आणि त्याचा कसा वापर करून घ्यायचा याचे कित्येक व्हिडिओ तेव्हा व्हायरल झाले होते.(Kora Turmeric Mask viral video)
2 / 7
आता असाच एक Kora Turmeric Mask सध्या व्हायरल होत आहे (how to make kora turmeric mask?). कित्येक सेलिब्रिटीही हा मास्क वापरत आहेत. राईस वॉटर प्रमाणेच हा देखील त्वचेसाठीचा एक साधा- सोपा उपाय आहे जो आपल्याला स्वयंपाक घरातले वेगवेगळे पदार्थ घेऊन करता येतो...(how to apply kora turmeric mask?)
3 / 7
आता हा मास्क कसा तयार करायचा आणि कसा लावायचा ते पाहूया.. त्यासाठी सगळ्यात आधी १ चमचा हळद गरम तव्यावर टाका आणि ती चॉकलेटी रंगाची होईपर्यंत चांगली भाजून घ्या.
4 / 7
यानंतर हळद थंड झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढा. तिच्यामध्ये १ चमचा कॉफी पावडर घाला.
5 / 7
यानंतर त्यामध्ये १ चमचा मध आणि १ चमचा दही घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हा मास्क चेहऱ्याला लावा.
6 / 7
यानंतर ५ ते ७ मिनिटांनी मास्क सुकायला लागल्यानंतर हलक्या हाताने चोळून तो काढून टाका. पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
7 / 7
तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल. टॅनिंग, डेडस्किन कमी होऊन त्वचेवर छान ग्लो आलेला दिसेल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी