त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

Updated:October 28, 2025 20:44 IST2025-10-28T20:35:41+5:302025-10-28T20:44:20+5:30

Kareena Kapoor Skin Care Beauty Hack : Kareena Kapoor Home Remedies For Glow : Kareena Kapoor Beauty Hack For Radiant Skin : त्वचा इन्स्टंट एकदम फ्रेश आणि ग्लोइंग दिसण्यासाठी करीना आयत्यावेळी करते एक खास सोपा उपाय...

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

बॉलिवूड अभिनेत्री 'करीना कपूर खान' तिच्या अभिनयासोबतच तिचा हटके लूक आणि ग्लोइंग (Kareena Kapoor Beauty Hack For Radiant Skin) त्वचेसाठी फारच लोकप्रिय आहे. करीना ४५ वर्षांची असून सोबतच ती दोन मुलांची आई देखील आहे, तरीही तिचा फिटनेस आणि तिची त्वचा आजही एखाद्या विशीतल्या तरुणीसारखीच आहे. करीना तिच्या त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी तिचे स्किनकेअर रुटीन न चुकता फॉलो करतेच.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

करीना आपली त्वचा कायम फ्रेश, हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यासाठी कोणतेही महागडे (Kareena Kapoor Skin Care Beauty Hack) उपाय न करता चक्क टिश्यू पेपरचा वापर करते. तिने नुकतेच एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपले ब्यूटी सिक्रेट शेअर केले आहे. करीनाने आपल्या व्हॅनिटी वॅनमध्ये बसून ओल्या टिश्यू पेपरचा मास्क लावून एक फोटो शेअर केला होता. जी त्वचा लगेच हायड्रेटेड करण्यासाठी आणि मेकअप करण्यासाठी आपली त्वचा तयार करण्यासाठी ही एक सोपी ट्रिक खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी फक्त एका टिश्यू पेपरला पाण्याने पूर्णपणे भिजवून घ्या आणि ते चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून थोडा वेळ तसेच ठेवा.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

हा ब्यूटी हॅक स्किन केअरच्या सर्वात सोप्या पद्धतींपैकी एक आहे. यासाठी कोणताही खर्च येत नाही आणि कधीही, कोणत्याही वेळी याचा वापर केला जाऊ शकतो. या साध्या सोप्या उपायामुळे काही वेळातच तुमची त्वचा एकदम फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागते.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

हा सोपा ब्यूटी हॅक आपण मेकअप करण्यापूर्वी आणि केलेला मेकअप चेहऱ्यावरून काढून टाकण्यासाठी अशा दोन्ही वेळी करु शकतो. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे स्किन केअर प्रॉड्क्ट्स लावण्यापूर्वी ओल्या टिश्यू पेपरचा पॅच काही वेळेसाठी चेहऱ्यावर लावून ठेवू शकता.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

याव्यतिरिक्त, आपण चेहऱ्यावर बर्फाचा एक छोटा तुकडा चोळून देखील त्वचा हायड्रेटेड ठेवू शकता आणि मेकअपसाठी त्वचेला तयार करू शकता. असे केल्याने त्वचा सीरम किंवा क्रीम सारख्या स्किन केअर प्रॉडक्ट्सना चांगल्या प्रकारे शोषून घेते. यामुळे तुमचा मेकअप देखील चांगल्या प्रकारे सेट होतो.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

ओल्या टिश्यू पेपरच्या वापरामुळे त्वचेची छिद्रे थोडी बंद होतात आणि त्वचा झटपट मेकअप रेडी होते. यामुळे फाउंडेशन किंवा कन्सीलर चेहऱ्यावर अधिक चांगल्या प्रकारे एकसारखे सेट होते आणि मेकअप जास्त काळ टिकतो.

त्वचेला इन्स्टंट ग्लो व हायड्रेटेड ठेवण्यासाठी करीना कपूर महागडे उपाय नाही तर करते एक देसी जुगाड...

स्किन केअरच्या इतर महागड्या उपायांच्या तुलनेत हा हॅक अत्यंत सोपा आणि अगदी कमी खर्चिक आहे. तो कुठेही आणि कधीही सहज करता येतो. थोडक्यात, करीना कपूरचा हा 'ओल्या टिश्यू पेपरचा' ब्यूटी हॅक त्वचेला ताजेपणा, हायड्रेशन आणि मेकअपसाठी उत्तम बेस तयार करण्यासाठीचा सोपा उपाय आहे.