संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

Updated:January 13, 2026 18:37 IST2026-01-13T17:18:09+5:302026-01-13T18:37:17+5:30

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

कोणताही सण म्हटला की त्या सणाच्या तयारीसाठी महिलांच्या मागे खूप धावपळ असते. त्या धावपळीतून स्वत:साठी वेळ काढणं जमतच नाही.

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

आता संक्रांतीला वाणवसा लुटायला जाणे, नंतर तिळगूळ घेण्यासाठी जाणे, संक्रांतीचे हळदीकुंकू अशी बरीच कामं महिलांच्या मागे असतात. त्यासाठी तयारीही भरपूर लागते. त्यातून वेळ काढून पार्लरमध्ये जाणं, फेशियल करून घेणं होत नाही. पण चेहरा छान चमकदार तर हवाच असतो.(instant facial at home)

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

म्हणूनच अशावेळी घरच्याघरी अतिशय सोप्या पद्धतीने फेशियल कसं करायचं ते पाहा. हे फेशियल करण्यासाठी तुम्हाला जास्तीतजास्त १५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी कच्चं दूध किंवा दही घ्या आणि आणि त्याने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटे चोळून मालिश करा (how to do instant facial at home?). त्यानंतर कापसाच्या बोळ्याने चेहरा पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावर धूळ, घाण निघून त्वचा स्वच्छ होईल.(makar sankrant special instant glow facial)

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

यानंतर पातेल्यामध्ये पाणी गरम करून किंवा मग स्टिमर वापरून वाफ घ्या. यामुळे चेहऱ्यावरचे बंद झालेले पोअर्स ओपन होेतात.

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

यानंतर तिसरी स्टेप म्हणजे स्क्रबिंग. स्क्रबिंग करण्यासाठी तुम्ही घरातलेच वेगवेगळे पदार्थ वापरू शकता. कॉफी, साखर आणि मध हे मिश्रण वापरून स्क्रबिंग करता येते. शिवाय बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ एका वाटीत घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद आणि कच्चं दूध घाला. हा लेप चेहऱ्याला लावून मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाते आणि त्वचा स्वच्छ, चमकदार होते.

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

आता सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे त्वचेला छान फेस मास्क लावणे. यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर किंवा मग कॉफी, मध आणि त्यात थोडा लिंबाचा रस अशा पर्यायांचा तुम्ही विचार करू शकता. हा मास्क चेहऱ्याला ५ मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर तो अर्धवट सुकत आला की हाताने चाेळून काढून घ्या.

संक्रांत स्पेशल : इंस्टंट ग्लो देणारं झटपट फेशियल, स्वयंपाकघरातील पदार्थच 'या' पद्धतीने चेहऱ्यावर चोळा, चेहरा चमकेल

यानंतर चेहरा स्वच्छ धुवा आणि व्यवस्थित मॉईश्चराईज करा. बघा त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल.