सकाळी नाश्त्याला ‘ही’ ५ फळं खाल्ली तर तुम्ही राहता नेहमी तरुण, डार्क सर्कल्स-पिंपल्सचा त्रासच नाही
Updated:June 11, 2025 18:05 IST2025-06-11T18:00:00+5:302025-06-11T18:05:01+5:30
Best fruits for glowing skin: Anti-aging fruits to eat in morning: ही ५ फळे आपण सकाळी ११ वाजण्यापूर्वी खाल्ली तर त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात. कोणती फळे खायला हवी पाहूया.

आपला चेहरा सुंदर-तजेलदार दिसावा असं आपल्यापैकी अनेकांना वाटत. वाढत्या वयात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण त्वचेवर अनेक क्रीम्स लावतो. परंतु, चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी फक्त महागड्या क्रीम्सच नाही तर आहार देखील महत्त्वाचा आहे. (Best fruits for glowing skin)
आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. पण त्याच्या आधी सगळ्यात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा दिसत असतील तर चेहऱ्यावर क्रीम नाही तर आहारात काही पदार्थांचा समावेश करण्याची गरज आहे. ( Anti-aging fruits to eat in morning)
ही ५ फळे आपण सकाळी ११ वाजण्यापूर्वी खाल्ली तर त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात. कोणती फळे खायला हवी पाहूया.
किवी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढून वृद्धत्व कमी होते.
काळी द्राक्षे त्वचेसाठी चांगली असतात. यात नैसर्गिक अँटी- एजिंग घटक आहे. जो सूर्याच्या अतिनिल किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतो.
पपई केवळ पोटासाठी नाही तर त्वचेसाठी बहुगुणी आहे. यात पपेन नावाचे एंजाइम असते, जे त्वचेच्या पेशी वाढविण्यास मदत करते. तसेच पिग्मेंटेशनची समस्या देखील टाळता येते.
स्ट्रॉबेरी आपल्या त्वचेसाठी चांगली आहे. यात एलाजिक ॲसिड असते, जे कोलेजनचे विघटन रोखते. यामुळे त्वचेवरील बारीक रेषा कमी होण्यास मदत होते.
आवळा खाल्ल्याने आपले संपूर्ण आरोग्य सुधारते. हे फळ व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण आहे. यामुळे त्वचा चमकदार आणि घट्ट बनते. तसेच वृद्धत्व कमी करता येते.